गंधर्व विवाहाच्या बहाण्याने उच्चशिक्षित तरुणींवर लैंगिक अत्याचार, इंजिनिअर साधूला अटक

मुंबई तक

धर्माच्या नावाखाली सुशिक्षित तरुणींचे ब्रेनवॉश करून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

गंधर्व विवाहाच्या नावावर उच्चशिक्षित तरुणींवर लैंगिक अत्याचार

point

इंजिनिअर साधूला अटक

Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवर्धन पोलीस ठाण्याच्या पथकाने धर्माच्या नावाखाली सुशिक्षित तरुणींचे ब्रेनवॉश करून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाला अटक केली आहे. साधूचा वेश परिधान केलेल्या या आरोपीची ओळख अभिषेक मिश्रा उर्फ ‘आदि कर्ता’ अशी झाली असून तो मूळचा भुवनेश्वरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे. हा आरोपी गेल्या तीन वर्षांपासून गोवर्धन परिसरात वास्तव्य करून ऑनलाइन माध्यमातून सुशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता. पोलिसांनी कारवाई करत या भोंदू बाबाच्या तावडीतून दोन तरुणी आणि एका तरुणाची सुटका केली आहे. तसेच त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

गंधर्व विवाहाच्या नावाखाली शारीरिक संबंध

अटक करण्यात आलेला आरोपी अभिषेक मिश्रा हा कोणताही अशिक्षित गुन्हेगार नसून तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चतुर आहे. तो सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भजन-कीर्तन मंडळी तयार करायचा. या माध्यमातून तो बी.टेक आणि एम.टेक झालेल्या उच्चशिक्षित तरुणींना लक्ष्य करत असे. तरुणींना करिअरचे उत्तम पॅकेज आणि आध्यात्मिक शांततेचे आमिष दाखवून तो गोवर्धन येथे बोलवून घ्यायचा. येथे आल्यानंतर तो या तरुणींचे मानसिकदृष्ट्या अशा प्रकारे ब्रेनवॉश करायचा की, त्या आपल्या घर-परिवाराला विसरून त्याच्या ग्रुपमध्ये सामील व्हायच्या. यानंतर हा भोंदू बाबा गंधर्व विवाहाच्या नावाखाली त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे शोषण करायचा.

हे ही वाचा : ‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?

12 हून अधिक मुली फसल्या

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत डझनभरहून अधिक महिला आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा या भोंदू बाबाचा मोबाईल फोन तपासला, तेव्हा त्यातून 25 ते 30 अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो जप्त करण्यात आले. पोलीस या फोटोंच्या आणि आरोपीच्या डिजिटल फूटप्रिंट्सच्या आधारे या घृणास्पद रॅकेटमध्ये इतर काही लोकांचाही समावेश आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश चंद्र रावत यांनी सांगितले की, ओडिशातील एका पीडित तरुणीने या नरकातून सुटका करून घेत हिंमत दाखवली आणि आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

हे ही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

आरोपीची रवानगी तुरुंगात

गोवर्धनचे उपअधीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी अभिषेक मिश्राला अटक केली. छापामारीच्या कारवाई दरम्यान पोलिसांनी बाबाच्या बेकायदेशीर ताब्यातून दोन तरुणी आणि एका तरुणाची सुखरूप सुटका केली असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना स्वाधीन केले आहे. आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात येत आहे.
 

हे वाचलं का?