पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

मिथिलेश गुप्ता

डोंबिवलीतील पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला धक्कादायक वळण लागलं आहे. पत्नीविरोधात गुन्हा, एफआयआरमधून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

ADVERTISEMENT

dombivli Vishnunagar police officer commits suicide due to alleged immoral relationship between wife and police sub-inspector
फाइल फोटो
google news

डोंबिवली: विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ (वय ३७) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मृताच्या भावाच्या तक्रारीवरून श्रीराम यांच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरले आहे.

२८ एप्रिलला केली होती आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

मृताच्या भावाची तक्रार, पत्नीविरोधात गुन्हा

हे वाचलं का?