‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?

मुंबई तक

MLA Sanjay Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत उघड धुसफूस पाहायला मिळत असून, भाजप शिवसेनेला संपवत असल्याचा गंभीर आरोप करत अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड या शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्याच मित्रपक्षाविरुद्ध भाष्य केलंय.

ADVERTISEMENT

Eknath Shinde
Eknath Shinde
google news

बातम्या हायलाइट

point

‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,

point

शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?

MLA Sanjay Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महायुतीमध्ये भाजपाने ही जागा आपल्या वाट्याला घेऊन सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असतानाच, शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजप सत्तेत असूनही शिवसेनेला हळूहळू संपवण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला असून, हे एक 'स्लो पॉयझन' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : समजून घ्याः C Voter चा सर्व्हे.. NEET सह परीक्षांमध्ये गोंधळ, तरूणांमध्ये प्रचंड संताप?

संजय गायकवाडही भाजपवर भडकले 

"भाजपा शिवसेनेला संपवेल ही अब्दुल सत्तारांची व्यथा खरी आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्तेत येता आलं आणि दुसऱ्यांदा सत्ता भोगता आली. दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण करून देखील कारवाई झाली नाही. सुनेत्राताई यांना राष्ट्रवादीच अर्थ खात देखील अजून देत नाहीत. भाजपाचे काही ज्येष्ठ नेते माझ्या मतदारसंघातील लक्षवेधी देखील लावू देत नाहीत", असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय.

अब्दुल सत्तारांनंतर गायकवाडांचीही खदखद 

अब्दुल सत्तार यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही भाजपवर आपली तीव्र नाराजी आणि खदखद व्यक्त केली आहे. भाजपला सत्तेत स्थान मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असताना, आता मित्रपक्षावरच अन्याय होत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. आपल्या मतदारसंघातील लक्षवेधी प्रश्नांवर भाजपचे ज्येष्ठ नेते अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण होऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हे वाचलं का?