सुपरवायझरनं महिलेला चुकीचा स्पर्श केला, रात्री व्हिडिओ कॉल..

crime news : एका कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका महिला शिंपीला शिफ्ट दरम्यान तिचा सुपरवायझर अयोग्यरित्या स्पर्श करत होता. जेव्हा पीडितेनं आक्षेपार्ह कृत्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्याला अधिकच प्रोत्सहान मिळाले. त्याने रात्री व्हिडिओ कॉलवर बोलण्यास अनेकदा दबाव टाकला होता.

crime news

crime news

मुंबई तक

• 04:16 PM • 16 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुपरवायझर पीडितेशी चुकीच्या पद्धतीने वागत होता

point

रात्री व्हिडिओ कॉल करण्यास जबरदस्ती अन् चुकीचा स्पर्श

Crime News : एका कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका महिला शिंपीला शिफ्ट दरम्यान तिचा सुपरवायझर अयोग्यरित्या स्पर्श करत होता. जेव्हा पीडितेनं आक्षेपार्ह कृत्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्याला अधिकच प्रोत्सहान मिळाले. त्याने रात्री व्हिडिओ कॉलवर बोलण्यास अनेकदा दबाव टाकला होता. जर असे केले नाही,तर आरोपीने कामावरून काढण्याची धमकी दिली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : साखरपुड्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, 3 तरुणांकडून नको तेच..

सुपरवायझर पीडितेशी चुकीच्या पद्धतीने वागत होता

आरोपीने सातत्याने केलेल्या या अशा कृत्याने महिला घाबरून गेली होती. गुरूवारी तिने फेज 3 ठाण्यात सुपरवायझरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असता, नोएडाच्या सेक्टर 68 येथील कारखान्यात महिला गेल्या काही वर्षांपासून शिवणकाम करत होती. तिचा सुपरवायझर काही दिवसांपासून तिच्याशी खूपच विचित्र पद्धतीने वागत होता. 

रात्री व्हिडिओ कॉल करण्यास जबरदस्ती 

महिला काम करताना तो तिच्या अनेकदा जवळ जायचा, त्या महिलेनं अयोग्यरित्या स्पर्श केला, नंतर तिची शिफ्ट संपली असता, प्रेम पालने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. सुपरवायझर सारखा पीडितेला हॉटेलवर न्यायचा आणि एकटीसोबत वेळ घालवण्यास सांगायचा. या प्रकरणी महिलेनं नकार दिल्यानंतर आरोपीने तिला रात्री व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला. तिने जेव्हा मोबाईल नंबर ब्लॉक केला तेव्हा तो चिडला. शिफ्ट सुरू असताना कामात चूक होत असल्याचं कारण सांगून तिचा छळ करायचा. 

एचआरने महिलेला दुपारी दुसरी नोकरी शोधण्यास सांगितली. यावरून पीडितेच्या लक्षात आले की, ती सर्वजण संगमताने वागत आहे. पीडितेनं आरोपींविरूद्ध आवाज उठवला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : 24 वर्षीय तरुणीला जंगलात नेलं, तोंडावर कापड टाकत चौघांनी..

महिला सुरक्षा विभागाच्या डीसीपींनी सांगितलं की, कामाच्या ठिकाणी कोणी तुमचा छळ केल्यास, प्रत्येक संस्था आणि कामाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या पीओएस समितीकडे करू शकता. संबंधित समिती जर कारवाई करण्यास अपयशी ठरली तर,. पोलीस ठाण्यात मिशन शक्ती केंद्रात तक्रार दाखल करता येईल, अशी माहिती दिली.