बॉयफ्रेंडची तरुणीकडे 'त्या' गोष्टीची मागणी, ती नाही म्हणाली… तरुणाने केला भलताच कांड

Crime News : प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत असं कृत्य करण्यामागचं कारण समोर आलं आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:44 AM • 02 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं तरुणाशी विवाह करण्यास दिला नकार...

point

प्रियकराकडून महिलेवर गोळीबार 

point

नेमकं काय घडलं?

Crime News : प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत असं कृत्य करण्यामागचं कारण समोर आलं आहे. प्रेयसीवर गोळीबार केल्यानंतर प्रियकराने विवाह देण्यास नकार दिल्याचा परिणाम आहे, असं सांगितलं. ही घटना बिहारच्या भागलापूर जिल्ह्यातील हरियो गवात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महिलेला एका मायागंज या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला पाटणा येथे रेफर केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीनं उधळला विजयी गुलाल, भाजपसह शिवसेनेचे 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी

महिलेनं तरुणाशी विवाह करण्यास दिला नकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणात जखमी झालेल्या महिलेला सांगितलं की, तिचा विवाह 2017 मध्ये भवानीपूर येथील हरिबोल कुमारशी झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत, परंतु हरियो गावातील रहिवासी असलेल्या बाल्मिकी कुमारने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली होती. पण तिने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला होता.

हे ही वाचा : पुण्यात पतीनं झोपेचं सोंग घेतल्याचा पत्नीचा आरोप, रागाच्या भरात पतीवर उकळता चहाच ओतला, अख्खा चेहरा भाजला

प्रियकराकडून महिलेवर गोळीबार 

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी, ती हरियो गावातून जात होती. त्यानंतर त्याने कंबरेतून पिस्तूल काढले आणि एका मंदिरातच तिच्यावर गोळीबार केल्याचं वृत्त आहे. गोळी झाडल्यानंतर त्याने सांगितलं की, 'लग्न न करण्याचा हा परिणाम आहे' या प्रकरणात आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात माहिती प्रसिद्ध केली होती.

    follow whatsapp