बर्थडे पार्टीत हत्येचा थरार! दाजीनेच चाकू भोसकून केला मेहुण्याचा खून; डान्स करण्यावरून वाद अन्...

एका तरुणाने आपल्या मेहुण्याचा चाकू भोसकून खून केल्याचं वृत्त आहे. गंभीररित्या जखमी झालेला पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. उपचारांसाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याला मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दाजीनेच चाकू भोसकून केला मेहुण्याचा खून

दाजीनेच चाकू भोसकून केला मेहुण्याचा खून

मुंबई तक

• 05:02 PM • 30 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बर्थडे पार्टीत हत्येचा थरार!

point

दाजीनेच चाकू भोसकून केला मेहुण्याचा खून

point

डान्स करण्यावरून वाद झाला अन् भयंकर घटना

Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक हत्येचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने आपल्या मेहुण्याचा चाकू भोसकून खून केल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बर्थडे पार्टीत आपल्या मुलींनी डीजेवर डान्स केल्यानंतर आरोपी दाजी प्रचंड संतापला आणि त्याने रागाच्या भरात मुलींचा हात पकडून त्यांना घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मेहुण्याने आपल्या दाजीला असं करण्यापासून थांबवलं असता त्या दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून आरोपीने त्याच्या मेहुण्याच्या छातीवर चाकूने वार केला. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेला पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. उपचारांसाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याला मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

या घटनेनंतर, पोलिसांना संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळतात, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. या घटनेतील आरोपी दाजी सलीम (60) याला पोलिसांनी अटक केल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तसेच, 37 वर्षीय मृत तरुण यूनुसचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. संबंधित घटना रविवारी रात्री लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीत घडली. 

हे ही वाचा: हनीमूनच्या रात्री बायको वाट पाहून थकली अन् सकाळी नवरा जाऊबाईच्या खोलीतून बाहेर येताना दिसला...

मुलींना डान्स करताना थांबवलं अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुर्जर चौक येथे राहणाऱ्या नईम यांच्या 6 वर्षीय मुलीचा रविवारी वाढदिवस होता. त्यावेळी, मामा सलीम आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा पार्टीत बोलवलं आणि संध्याकाळी तो आपल्या मुलीला घेऊन पार्टीत आला. त्यावेळी, त्याचा मेहुणा यूनुस सुद्धा बर्थडे पार्टीसाठी आला होता. केक कटिंगनंतर, डीजेच्या गाण्यावर सगळे डान्स करत असता सलीमच्या मुलीसुद्धा सगळ्यांसोबत नाचू लागल्या. मात्र, हे पाहून त्यांच्या वडिलांना म्हणजेच सलीमला प्रचंड राग आला. त्याने आपल्या मुलींचा हात पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या मेहुण यूनुसने दाजीला समजवण्यासाठी हस्तक्षेप केला. 

हे ही वाचा: रागाच्या भरात चाकू भोसकून पत्नीची हत्या अन् नंतर, फाशी घेत आत्महत्या... शेजाऱ्यांनी सांगितलं कारण

रागाच्या भरात मेहुण्याच्या छातीवर चाकूने वार 

यावेळी, दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून सलीमने आपल्या मेहुण्यावर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर, यूनुस रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच, हत्येत वापरण्यात आलेला चाकू सुद्धा पोलिसांनी जप्त केला. आता, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp