Mumbai News : मराठी मालिकासृष्टीतील अभिनेत्री या कोणत्याही कारणाने चर्चेत असतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीचं नाव गुन्हेगारी प्रकरणात समोर आलं आहे. दोन महिलांनी एका बिल्डरकडून 10 कोटींची मागणी केली होती.ती महिला दुसरी तिसरी कोणीही नसून मराठी अभिनेत्री आहे. ही घटना मुंबईच्या गोरेगावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं मनोरंजन विश्वातही खळबळ उडाली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव हेमलता पाटकर असल्याचं सांगण्यात येत आहे. हेमलता पाटकर या 'आई कुठे काय करते?' या मालिकेत कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांच्या सून आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित आघाडीनं युतीची घोषणा केली, कोण किती जागा लढणार? आकडा समोर
10 कोटींची मागणी
गोरेगाव येथील प्रसिद्ध असलेले बांधकाम व्यवसायिक अरविंद गोयल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे. संबंधित प्रकरणात गोयल यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यातच यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा मिटवण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून मदत मिळवण्याच्या उद्देशाने हेमलता आणि तिच्या साथीदाराने गोयल यांच्याकडे तब्बल 10 कोटींची मागणी देखील केली होती.
कोण आहे गुन्हेगार महिला?
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख समोर आली आहे. 'आई कुठे काय करते?' या मालिकेत कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांची ती सून आहे. या प्रकरणात ती चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच याच कटातील भागीदार म्हणून अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस ही सांताक्रूझची रहिवासी आहे.
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर ही सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी तिच्यावर मेघवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर याच प्रसंगी अनधिकृत प्रवेश आणि दमदाटी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांनी शत्रूंपासून सावध राहा नाहीतर... काय सांगतंय राशीभविष्य?
या प्रकरणात दोन्ही महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण या प्रकरणात दोघीही तपासास सहकार्य करताना दिसत नाहीत. दरम्यान, त्यांनी इतर कोणालाही लुटले का? असा तपास पोलिसांनी केला आहे. अशातच आता दोन्ही आरोपींना सोमवारी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











