गेल्या वर्षी डबल अन् आता ट्रिपल मर्डर; पैशाचा पाऊस पाडणारा तांत्रिक 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Crime News : पैशाचा पाऊस पाडण्याचं अमिष दाखवून एका 72 वर्षीय मांत्रिकाने तिघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या पीरागढी भागातील ही घटना आहे. दिल्लीतील पश्चिम विहार ईस्ट पोलिसांना एका कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि सगळं सत्य समोर आलं. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:26 PM • 12 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

गेल्या वर्षी डबल अन् आता ट्रिपल मर्डर;

point

पैशाचा पाऊस पाडणारा तांत्रिक 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Crime News : पैशाचा पाऊस पाडण्याचं अमिष दाखवून एका 72 वर्षीय मांत्रिकाने तिघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या पीरागढी भागातील ही घटना आहे. दिल्लीतील पश्चिम विहार ईस्ट पोलिसांना एका कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि सगळं सत्य समोर आलं. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : संपत्ती आणि पेन्शनचा वाद! बहिणी-बहिणींमध्ये जुंपली; आईचा संशयास्पद मृत्यू

कारमध्ये आढळले होते मृतदेह

रविवारी (8 फेब्रुवारी) पश्चिम विहार ईस्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारमध्ये रणधीर, शिव नरेश आणि लक्ष्मी या तिघांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले होते. या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत खळबळ उडाली होती. डीसीपी सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी या ठिकाणाहून परतत असताना आरोपी कमरुद्दीनने या तिघांना तंत्र-मंत्राचा भाग म्हणून काही पदार्थ खायला दिले होते. प्रत्यक्षात त्या लाडूंमध्ये विष कालवले होते, ज्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे की, अटक करण्यात आलेला कमरुद्दीन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल आहे. मे 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद जिल्ह्यातील मक्खनपूर येथेही त्याने अशाच प्रकारे दोन जणांची हत्या केली होती. तिथेही त्याने जमिनीतील गाडलेले धन काढून देण्याचे आमिष दाखवून रामनाथ आणि पुरन नावाच्या व्यक्तींना विषारी पदार्थ देऊन संपवले होते. त्या प्रकरणात त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.

हे ही वाचा : आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा

लूट हाच मुख्य उद्देश

आरोपी कमरुद्दीन तंत्र-मंत्राच्या बहाण्याने लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्याकडील रोकड व मौल्यवान वस्तू लुटण्यासाठी त्यांची हत्या करायचा. दिल्ली पोलिसांनी आता त्याच्यावर हत्या आणि लूटमारीचे गुन्हे दाखल केले असून अधिक चौकशी सुरू केली आहे. वारंवार अशा घटना घडूनही लोक अंधश्रद्धेला बळी पडून आपला जीव धोक्यात घालत आहेत, याबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
 

    follow whatsapp