बलात्कार, गुप्तांगात बाटली आणि दगडाने ठेचलेला चेहरा..मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सापडला महिलेचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

एका महिलेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, तपासणी दरम्यान मृत महिलेच्या गुप्तांगात एक बाटली आढळून आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:31 PM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बलात्कार, गुप्तांगात बाटली आणि दगडाने ठेचलेला चेहरा..

point

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सापडला महिलेचा मृतदेह

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका महिलेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, तपासणी दरम्यान मृत महिलेच्या गुप्तांगात एक बाटली आढळून आली आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर शहरातील एका मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ रक्ताने माखलेला हा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हे वाचलं का?

ओळख मिटवण्यासाठी चेहरा देगडाने ठेचला

मारेकऱ्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. महिलेच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा असून तिच्या डोक्यावर आणि मानेवर जीवघेणे वार करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर, मृतदेहाची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी महिलेचा चेहरा दगडाने अतिशय वाईटरीतीने ठेचून काढला आहे. ही घटना पाहता हा प्रकार जुन्या वैमनस्यातून किंवा सुनियोजित कटाचा भाग असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : 'कुणाला सांगितलं तर परीक्षेत नापास करीन..' विद्यार्थ्यांना भीती दाखवून मुख्याध्यापक करायचा लैंगिक शोषण, 'असं' बाहेर आलं प्रकरण

पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच डीआयजी राजेश कुमार अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्ट मार्टमसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. मुख्य रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप असून त्यांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि पोलीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे ही वाचा : आईला झाली दुसऱ्या लग्नाची घाई, 8 वर्षांच्या लेकीला फेकले रेल्वेखाली; धक्कादायक प्रकरण

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगवान केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध सुरू आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.