पीडितेशी गैरकृत्य केलं, नंतर कपडे फाडले, 42 सेकंदांचे तीन व्हिडिओ..

Crime News : तरुणांनी मिळून पीडितेशी वाईट वर्तन केल्याची घटना आहे. संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 09:33 AM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिघांनी मिळून तिला पकडले आणि तिला रस्त्यावर ढकलून...

point

42 सेकंदांचे तीन व्हिडिओ क्लिप्स...

Crime News : बिहारच्या नालंदामध्ये एका महिलेसोबत लज्जास्पद प्रकार घडला होता. तरुणांनी मिळून पीडितेशी वाईट वर्तन केल्याची घटना आहे. संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. पीडित महिला ही गावातील किरणा मालाच्या दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता, तिच्यावर तिघांनी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

तिघांनी मिळून तिला पकडले आणि तिला रस्त्यावर ढकलून...

घडलेल्या घटनेनुसार, 26 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या सुमारास ती किरणा मालाच्या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेली. त्याचदरम्यान गावातील अशोक यादव, महालू महातो आणि रविकांत कुमार या तिघांनी मिळून तिला पकडले आणि तिला रस्त्यावर ढकलले. त्यानंतर महालू महातोने तिच्या छातीवर चुकीचा स्पर्श केला आणि तिचे कपडे फाडत तिच्यावर बळजबरी केली, त्यानंतर पीडित तरुणी घटनास्थळी बेशुद्धावस्थेत पडली. सर्व गोंधळ ऐकून ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी माझा जीव वाचवला असं पीडितेचं म्हणणं आहे. 

42 सेकंदांचे तीन व्हिडिओ क्लिप्स...

सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओत अंदाजे 42 सेकंदांचे तीन व्हिडिओ क्लिप्स आहेत. व्हिडिओत अनेक पुरुष महिलेवर जबरदस्ती हल्ला करताना दिसताहेत. व्हिडिओदरम्यान, पीडित महिला व्हिवळू लागली. पीडितेचा नवरा हा नाशिकमध्ये रोजगार करतो, ती महिला नूरसराई पोलीस ठाणे परिसरातील गावात तिच्या सासरच्या मंडळींसोबत राहते. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुण्यातील हवाई प्रवाशांसाठी मोठी अपडेट, 'या' शहरांना थेट कनेक्टिव्हीटी

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महिलेनं पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करत अशोक यादव आणि नवनीत कुमार नरोत्तमक यांना अटक केली. इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.