कष्ट करुन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवलं अन् तोच मुलगा जीवावर उठला; आई-वडिलांचा 'असा' केला अंत

Software Engineer kills Parents : एका उच्चशिक्षित मुलाने आपल्याच आई-वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. त्याने 60 वर्षीय निवृत्त नेव्ही कॅप्टन नवीनचंद्र भट आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी डॉ. श्यामला भट यांचा खून केला. बुधवारी (11 फेब्रुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास हे हत्याकांड घडले. आरोपी मुलगा रोहनचंद्र भट (33) याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

Software Engineer kills Parents

Software Engineer kills Parents

मुंबई तक

• 03:38 PM • 12 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कष्ट करुन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवलं अन् तोच मुलगा जीवावर उठला

point

आई-वडिलांचा 'असा' केला अंत

Software Engineer kills Parents : एका उच्चशिक्षित मुलाने आपल्याच आई-वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. त्याने 60 वर्षीय निवृत्त नेव्ही कॅप्टन नवीनचंद्र भट आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी डॉ. श्यामला भट यांचा खून केला. बुधवारी (11 फेब्रुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास हे हत्याकांड घडले. आरोपी मुलगा रोहनचंद्र भट (33) याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. बेंगलोरमधील विज्ञान नगर येथील 'आदर्श विस्टा' अपार्टमेंटमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'त्याला त्याच्या भाषेमुळे अन्...', पुण्यात पश्चिम बंगालच्या युवकाची हत्या झाल्यानंतर ममता बॅनर्जींची पोस्ट; काय म्हणाल्या?

भर सकाळी घरातच रक्ताचा सडा

आरोपी रोहन हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो स्वतःचा स्टार्टअप देखील चालवतो. बुधवारी सकाळी किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि रोहनने आपल्या आई-वडि‍लांवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांपत्याला तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच सकाळी सव्वा आठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निवृत्त लष्करी अधिकारी आणि डॉक्टर पत्नीच्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल

पोलि‍सांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे कौटुंबिक कलह हे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात वाद सुरु होते, ज्याचा शेवट या भीषण घटनेने झाला. मणीपाल रुग्णालयाशी संबंधित डॉ. माधवी नायर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हा गुन्हा पूर्व नियोजित कट रचून केला की रागाच्या भरात, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय... पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात

अमेरिकेतील मुलीला माहिती

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. मृत दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असून तिला या दुर्दैवी घटनेची कल्पना देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी रोहनला अटक केली असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एक उच्चशिक्षित तरुण आपल्याच पालकांचा इतक्या क्रूरपणे बळी कसा घेऊ शकतो, या प्रश्नाने संपूर्ण बेंगलोर शहर सुन्न झाले आहे.
 

    follow whatsapp