Crime News : एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन स्वतःही आपले जीवन संपवले आहे. सुनील आणि सिमरन असे या मृत जोडप्याचे नाव आहे. सोमवारी (9 फेब्रुवारी) रात्री या दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. यानंतर या दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. या वादानंतर सुनीलने सिमरनचा गळा दाबून खून केला आणि यानंतर सिमरनच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सिमरनच्या गळ्यावर खुणा आढळल्याने तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. हरियाणातील सिरसा येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आईला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले, 14 वर्षीय मुलासोबत आईने काय केले? हादरवून टाकणारं प्रकरण
दुबईला जाण्याचा बनाव
सुनील आणि सिमरन यांची भेट हरियाणातील रतिया येथे एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करत असताना झाली होती. इथूनच त्यांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली. धक्कादायक बाब म्हणजे सुनीलने सहा महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबाला आपण नोकरीसाठी दुबईला जात असल्याचे खोटे सांगितले होते. प्रत्यक्षात तो रतियामध्येच काम करत होता. जेव्हा घरच्यांना हे समजले, तेव्हा ते त्याला परत त्याच्या गावी जींद याठिकाणी घेऊन आले होते. दरम्यान, दोन्ही कुटुंबांना त्यांच्या नात्याची माहिती झाल्यामुळे सिमरनने सुनीलशी बोलणे बंद केले होते.
दारुच्या नशेत हत्या
सोमवारी सुनील कोणालाही न सांगता जींदहून सिरसा येथे पोहोचला. त्याने रात्री उशिरा सिमरनची भेट घेतली आणि ते दोघेही इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले आणि त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. सिमरन अंथरुणावर झोपलेली असताना सुनीलने तिचा गळा आवळून खून केला. नशेत असल्याने सिमरनला स्वतःचा बचाव करता आला नाही. त्यानंतर सुनीलने सिमरनच्याच ओढणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
हे ही वाचा : सुनेवर वेश्या व्यवसायासाठी दबाव, सासर की दलालांचं घर? सुनेनं घेतला टोकाचा निर्णय
तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळाकडून तपासणी
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळाने सिमरनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शरीरातील अवयव (व्हिसेरा) सुरक्षित ठेवण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











