आईला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले, 14 वर्षीय मुलासोबत आईने काय केले? हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यानंतर आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याची भीती वाटल्याने आईने आपल्या पोटच्या मुलालाच संपवले. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. आणि तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा होता. आपल्या 14 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करताना आईचे हात जरादेखील कापले नसतील का असा प्रश्न विचारला जात आहे.

crime news

crime news

मुंबई तक

12 Feb 2026 (अपडेटेड: 12 Feb 2026, 12:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले

point

14 वर्षीय मुलासोबत आईने काय केले?

Crime News : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यानंतर आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याची भीती वाटल्याने आईने आपल्या पोटच्या मुलालाच संपवले. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. आणि तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा होता. आपल्या 14 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करताना आईचे हात जरादेखील कापले नसतील का असा प्रश्न विचारला जात आहे. आयुष कुमार असे या मुलाचे नाव असून झारखंडच्या बरहरवा परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणाचे 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार, मशिदीच्या छतावर नेत नको तेच... सीसीटीव्हीतून सत्य आलं समोर

वडिलांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग

7 फेब्रुवारी 2026 रोजी रतनपुर येथील एका तलावाजवळ आयुष कुमारचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. सुरुवातीला हे प्रकरण अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हत्येचे वाटत होते.  मुलाचे वडील हेमंत कुमार साह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मृताची आई मीनू देवी (33) आणि तिचा प्रियकर रोहित साहा (30) यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अनैतिक संबंधांतून घडले हत्याकांड

मीनू देवी आणि तिचा नात्याने भाचा लागणारा रोहित साहा यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 7 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा आयुषचे वडील घरी नव्हते, तेव्हा मीनूने रोहितला घरामागे भेटायला बोलावले होते. दुर्दैवाने, आयुषने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि या गोष्टीला तीव्र विरोध केला. आपले हे गुपित उघड होईल आणि समाजात बदनामी होईल, या भीतीने या दोघांनी मिळून आयुषचा गळा आवळून त्याला कायमचे संपवले.

हे ही वाचा : आजारी बायकोनं जेवण बनवण्यास दिला नकार, मद्यधुंद नवऱ्याने पत्नीवर गोळ्या झाडल्या

आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बरहरवाचे एसडीपीओ नितीन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आरोपींनी हत्येची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर दिशाभूल करण्यासाठी त्यांनी मृतदेह तलावाकाठी टाकला होता, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला. सध्या दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

    follow whatsapp