Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका विशाल यादव नावाच्या तरुणाचा मृतदेह शेतात आढळल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना बुधवारी (24 डिसेंबर) उघडकीस आली. तसेच, मृतदेहाची अवस्था पाहता तरुणाला गंभीररित्या मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. दोन दिवसांपूर्वी, विशाल रात्री आपल्या घरात जेवत असताना त्याच्या प्रेयसीला त्याला फोन आला आणि त्यानंतर तो जेवणावरून उठून तिला भेटण्यासाठी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेब आढळला.
ADVERTISEMENT
डोक्यात जड वस्तूने हल्ला करून हत्या...
26 वर्षीय पीडित विशालचा शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. तसेच, आसपासच्या जमिनीवर विखुरलेल्या मातीवरून तरुणाने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा: पत्नीचे शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध! त्या दिवशी सासुने सुनेला प्रियकरासोबत पाहिलं अन् भयानक पद्धतीने शेवट...
रात्री तरुणाला प्रेयसीचा फोन आला अन्...
पोलिसांच्या तपासादरम्यान, त्याच्या खिशातून एक मोबाईल फोन आणि बाईकची चावी सापडली. याव्यतिरिक्त, मृतदेहापासून काही अंतरावर तरुणाची चप्पल आणि एक टॉवेल आढळला. पोलिसांनी मोबाईल फोनच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. विशालची आई शकुंतला मंगळवारी रात्री जवळपास 9:30 वाजताच्या सुमारास जेवण बनवत होती. त्यावेळी, विशालच्या मोबाईलवर एका तरुणीचा फोन आला आणि त्यानंतर तो लगेच घराबाहेर पडला. परंतु, रात्रभर तो घरी परतलाच नाही. आता, कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: कबुतरांना खायला घालणं पडलं महागात! मुंबईतील व्यावसायिकाला कोर्टाने ठोठावला 'इतका' दंड...
पोलिसांनी दिली माहिती
विशाल मुंबईत कार पेंट-पॉलिशचं काम करत असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय होता. तो कुटुंबातील मोठा मुलगा असल्याकारणाने त्याच्याच कमाईतून घर-खर्च केला जात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 डिसेंबर रोजी सकाळी शेतात तरुणाचा मृतदेह आढळला आणि मृताच्या कुटुंबियांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणासंबंधी संशयितांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











