दोन्ही मुली सहा वर्षांपासून एकाच घरात... कधीच बाहेर पडल्या नाहीत अन् अचानक मृत्यू! 'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं?

सामाजापासून पूर्णपणे दूर असलेल्या या बहिणी ना कधी कोणाच्या लग्नाला उपस्थित राहिल्या आणि ना कधी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. कुटुंबियांनाही आपल्या दोन्ही मुलींना भूत झपाटल्याचा संशय होता.

दोघींचा अचानक मृत्यू! 'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं?

दोघींचा अचानक मृत्यू! 'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं?

मुंबई तक

• 04:57 PM • 27 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सहा वर्षांपासून दोन्ही मुली एकाच घरात...

point

कधीच बाहेर पडल्या नाहीत अन् अचानक मृत्यू!

point

'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं?

Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊच्या पारा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय कैलाश सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरी अतिशय विचित्र वातावरण होतं. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या दोन मुली, राधा (24) आणि जिया (22) यांचं वर्तन एका मिस्ट्री (गुढते) पेक्षा कमी नव्हतं. सामाजापासून पूर्णपणे दूर असलेल्या या बहिणी ना कधी कोणाच्या लग्नाला उपस्थित राहिल्या आणि ना कधी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. त्यांचं जग एका खोलीत आणि त्यांच्या पाळीव कुत्रा जर्मन शेफर्ड टोनीपुरतं मर्यादित होतं. 

हे वाचलं का?

दोन्ही मुलींना भूत झपाटल्याचा संशय

कैलाश सिंगचं घर नेहमीच शांत असायचं. त्या दोन्ही बहिणी नेहमीच आपलं जेवण कुटुंबियांपासून वेगळं बनवायच्या आणि नेहमीच त्यांचा पाळीव कुत्रा टोनीसाठी जेवणातील काही भाग राखून ठेवायच्या. त्यांची आई, गुलाबा देवी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुली इतक्या विचित्र झाल्या होत्या की फक्त फोटो काढण्याच्या नावाने त्या प्रचंड संतापायच्या. शेजारच्या लोकांचं म्हणणं आहे की त्या अनेकदा भूत-प्रेतांबाबत बोलायच्या. त्यांच्या कुटुंबियांनाही आपल्या दोन्ही मुलींना भूत झपाटल्याचा संशय होता आणि म्हणून त्यांना उपचारांसाठी बालाजी रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र, त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांनो! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 12 स्पेशल लोकल धावणार...

टोनी हाच जगण्याचं एकमेव कारण

कालांतराने, त्यांचा कुत्रा टोनी हाच त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण बनला. गेल्या महिन्याभरापासून टोनी पोटाच्या एका गंभीर आजाराने ग्रस्त होता. टोनीची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून जियाच्या धाकट्या बहिणीची मानसिक अवस्था बिघडली. या आजारातून टोनी वाचणार नाही अशी त्यांना खात्री पटली. या नैराश्यात, बुधवारी दोन्ही बहिणींनी एक भयानक आणि टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी, त्यांनी घरात असलेलं फिनाईल प्यायलं. 

हे ही वाचा: बीड : विधवा महिलेवर बलात्कार, नराधमाने भाजी नेण्यास बोलावलं अन् कोणी नसल्याचं समजताच...

दोघींनी फिनाईल प्यायल्यानंतर त्यांनी आपल्या आईला याबद्दल सांगितलं. त्यावेळी, त्यांचा भाऊ त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, वाटतेच राधाचा मृत्यू झाला आणि उपचारांदरम्यान, जियाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. टोनी आता वाचणार नाही, या दु:खात त्या दोघींनी सुद्धा आत्महत्या केली. आता, या प्रकरणासंबंधी काही प्रश्नांची अद्याप उत्तरे समोर आली नाहीत. 

    follow whatsapp