Crime news : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. नजीबाबाद येथील एका महामार्गावर पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताची समीर अशी ओळख निर्माण झाली होती. समीरच्या वडीलांचे नाव दिलशाद होते, त्यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याचं सांगितलं. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते, नंतर पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांनी एक असं सांगितलं तेव्हा ते सर्वच थक्क झाले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लातूर हादरलं! PSI च्या त्रासाला कंटाळून तरुणानं झाडाला दोर बांधून संपवलं जीवन, धडकी भरवणारी घटना
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात तपासातून समोर आले की, समीरला त्याच्याच चुलत भावाचे वेड लागले होते. तो कोणत्याही परिस्थिती तिच्याशी संबंध ठेवू इच्छित होता. तो तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करू इच्छित होता. अशातच त्याचा खून करण्यात आला आणि नंतर समीरला सापळ्यात अडकून मारण्यात आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले की, समीर त्याच्या चुलत भावासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करू इच्छित होते. त्याचे काका त्याला अनेकदा विरोध दर्शवत होते. त्याने नंतर वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने या बाबतीत नकार दिला होता. अशातच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाची माहिती अस्वस्थ झालेल्या काकांनी दिल्लीतील त्याचा मित्र झैनुलला सांगितली होती. नंतर झैनुलने समीरकडून लाखो रुपये उकळण्यासाठी फसवणूक केली, तोवर हत्येची कोणतीही चर्चा झालेली नव्हती. अंतिमक्षणी समीरच्या हत्या झाली.
20 लाख रुपये मोजावे लागतील
एका वृत्तानुसार, झैनुलनं समीरच्या काकांना सांगितलं की, मी मुलीचा पाठलाग करणं थांबवले, पण त्यासाठी त्याला सुमारे 20 लाख रुपये मोजावे लागतील. याबाबत काकांनी होकार देऊन 5 लाख रुपये देखील दिले होते. झैनुलने पहिल्यांदा एका मुलीच्या नावाने बनावट सोशल माीडियावर अकाउंट बनवलं होतं.
जैनुलने नजीबाबाद येथील जादूटोणा करणारा मित्र अर्शदला या प्रकरणात सामील केलं. तांत्रिक विधींद्वारे त्यांनी समीरला मुलीला विसरण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. काहीही यश आले नाही आणि समीर तिचा पाठलाग करत राहिला होता. हे सर्व पाहून झैनुल अस्वस्थ झाला आणि अंतिमक्षणी समीरला मारण्याचा कट देखील रचण्यात आला होता. त्याने आरीफ आणि सलीम या दोन साथीदारांची मदत घेतली होती. तसेच 20 डिसेंबर रोजी झैनुलने समीरला भेटायला बोलावले. तेव्हा त्याला संबंधित मुलगी देखील भेटायला येत असल्याची माहिती दिली होती. नंतर समीर हा त्याच्या दुचाकीवर आला, नंतर समीरने मुलीबाबत विचारले असता, झैनुल एक कार घेऊन आला, ज्यात त्याचे दोन साथीदार आधीच बसले होते.
मफलरने गळा दाबून हत्या
समीरला गाडीच आमिष दाखवून नेण्यात आले आणि त्याला सांगण्यात आले की, मुलगी येणार आहे आणि ते तिची वाट बघत होते. समीर मागे बसताच, जैनुलच्या दोन साथीदारांनी मफलरने त्याचा गळा दाबून हत्या केली, ही हत्या एक अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी दुचाकी महामार्गावरील एका कडेला उभी केली आणि मृतदेह जवळच टाकून दिला होता.
हे ही वाचा : निकालानंतर 5 दिवसात नगरसेवक महिलेच्या पतीचा खून, आता हत्याप्रकरणात सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचं नावं समोर
या प्रकरणी शहराचे पोलीस अधीक्षक कृष्ण गोपल सिंह म्हणाले होते की, पोलिसांनी सध्या मृत तरुणाचा काका रफिक, त्याने दोन चुलत भाऊ राहत आणि रफत या घटनेत सहभागी असलेले जादूटोणा करणारा अर्शद यांना अटक करण्यात आली. जैनुल आणि त्याचे इतर काही साथीदार आरिफ आणि सलीम हे फरार असून सध्या त्यांचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT











