Crime News: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या दोन्ही मुलांना फासावर लटकवून नंतर स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. 27 वर्षीय रचना लोधी अशी आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख समोर आली असून तिने आपल्या 5 वर्षांचा मुलगा ऋषभ आणि दोन वर्षीय राम यांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, घराच मागच्या खोलीत रचना आणि तिच्या मुलांचे फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. सकाळी कुटुंबातील सदस्य शेतातून घरी परतल्यानंतर, त्यांना खोलीत हे भयानक दृष्य दिसलं आणि हे दृष्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर, रहली पोलीस ठाण्यातील पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह खाली उतरवून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तसेच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमने सुद्धा घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले.
हे ही वाचा: 18 वर्षीय तरुणीचे चुलत भावाशी संबंध, गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; पण अचानक प्रकृती बिघडली अन् मृत्यू
फासावर लटकलेल्या अवस्थेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह..
कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित रचना ही तिचा पती राजेश लोधी आणि तिच्या मुलांसह घरात राहत होती. घटनेच्या रात्री राजेश त्याच्या भावांसोबत शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. रात्री 10:45 च्या सुमारास तो घरात परत आला तेव्हा त्याला त्याच्या पत्नी आणि मुलांचे फासाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. आता, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
हे ही वाचा: नवी मुंबई हादरली! हिंदीत बोलत होती, म्हणून 6 वर्षांच्या लेकीलाच संपवलं... मुलगी झाल्याच्या तणावात आईचं निर्दयी कृत्य
कौटुंबिक वादातूनच टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कौटुंबिक वादातूनच पीडितेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ही आत्महत्या आहे की, कोणत्या कारणावरून झालेली हत्या आहे? हे तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, मृत महिलेचा भाऊ रविंद्र लोधी याने पोलिसांकडून पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. तसेच, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, तिन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आहे. आता, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT











