ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हारला अन् नैराश्यातून 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल!

एका 24 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हारल्यानंतर आत्महत्या केली. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.

नैराश्यातून 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल!

नैराश्यातून 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल!

मुंबई तक

• 12:58 PM • 28 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हारल्याने तणाव...

point

नैराश्यातून 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल!

Suicide Case: ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी समोर आली आहे. तरुणाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना हैदराबादच्या सुरारम परिसरात घडली असून येथे एका 24 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हारल्यानंतर आत्महत्या केली. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुण सध्या बेरोजगार असून तो पूर्वी एका शैक्षणिक संस्थेत लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित तरुणाचा त्याच्या एका नातेवाईकाच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर, मृताच्या कुटुंबियांकडून त्वरीत पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. 

हे ही वाचा: "मला त्या PSI ने त्रास..." लातूरमध्ये तरुणाने संपवलं जीवन अन् पोलीस कर्मचाऱ्यांवर केले गंभीर आरोप!

मोबाईलमध्ये व्हिडीओ सापडला अन्... 

प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. पोलिसांनी मृताचा मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये एक रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सापडला. त्या व्हिडीओमध्ये तरुणाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात पैसे गमावल्याचं सांगितलं आहे. अद्याप, तरुणाचं नेमकं किती आर्थिक नुकसान झालं? हे स्पष्ट झालं नाही. प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुण मानसिक तणावात असून याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. 

हे ही वाचा: आहिल्यानगर: रेल्वे ट्रॅकवरुन जाताना युवक मोबाईलवर बोलण्यात मग्न, तितक्यात गोवा एक्सप्रेस आली अन् चिरडून गेली

ऑनलाइन गेमिंगच्या नादातून आत्महत्या... 

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण नेमकं कोणत्या प्रकारचे ऑनलाइन गेम खेळत होता आणि तो कोणत्याही कर्जाखाली किंवा दबावाखाली होता का हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली जात आहे.

    follow whatsapp