18 वर्षीय तरुणीचे चुलत भावाशी संबंध, गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; पण अचानक प्रकृती बिघडली अन् मृत्यू

चुलत भावाशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एक 18 वर्षीय तरुणी गरोदर राहिली आणि त्यानंतर, तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यामुळे तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन्...

गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन्...

मुंबई तक

• 12:23 PM • 27 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

18 वर्षीय तरुणीचे चुलत भावाशी संबंध

point

गरोदर राहिल्याने बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या

point

अचानक प्रकृती बिघडली अन् पीडितेचा मृत्यू

Crime News: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून नातेसंबंधाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चुलत भावाशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एक 18 वर्षीय तरुणी गरोदर राहिली आणि त्यानंतर, तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यामुळे तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीच्या सफरदरजंग रुग्णालयात पीडितेचा मृत्यू झाला असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

पीडितेच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार, तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खायल्या देण्यात आल्या. यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणासंबंधी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: पुणे: प्रेमविवाह केला, पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचा घटस्फोट... एका रात्रीत असं घडलं तरी काय?

गरोदर राहिल्यामुळे गर्भपाताच्या गोळ्या दिल्या..   

कुटुंबियांनी दाखल केलेच्या तक्रारीत म्हटलं आहे की, मुलीने तिच्या चुलत भावाशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि यामुळे ती गर्भवती राहिली होती. त्यानंतर, पीडितेच्या चुलत भावाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि यामुळे तरुणीची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबियांनी पीडितेला 18 डिसेंबर रोजी नोएडा येथील रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारांनंतर पीडितेची गंभीर प्रकृती पाहून तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात रेफर केलं. मात्र, 23 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तरुणीची मृत्यू झाला. 

हे ही वाचा: नवी मुंबई हादरली! हिंदीत बोलत होती, म्हणून 6 वर्षांच्या लेकीलाच संपवलं... मुलगी झाल्याच्या तणावात आईचं निर्दयी कृत्य

पोलिसांचा तपास 

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात, मृताच्या वडिलांनी सेक्टर-39 पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तरुणीच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सध्या, पोलिसांकडून आरोपीची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सच्या आधारे, प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.  

    follow whatsapp