पुणे: प्रेमविवाह केला, पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचा घटस्फोट... एका रात्रीत असं घडलं तरी काय?
पुण्यात एका नवविवाहित जोडप्याने लग्न झाल्यानंतर केवळ 24 तासांतच एकमेकांपासून वेगळं होण्याचा म्हणजेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेमविवाह केला, पण दुसऱ्याच दिवशी दोघांचा घटस्फोट...
एका रात्रीत असं घडलं तरी काय?
पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News: पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित जोडप्याने लग्न झाल्यानंतर केवळ 24 तासांतच एकमेकांपासून वेगळं होण्याचा म्हणजेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर, त्या दोघांमध्ये गंभीर वाद झाला आणि त्यांचा हा वाद थेट न्यायलयात पोहोचला. त्यावेळी, त्यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
परस्पर संमतीने लग्न मोडलं...
अॅडव्होकेट राणी सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पती आणि पत्नीमध्ये गंभीर कारणावरून मतभेद झाले आणि त्यातून हा वाद वाढत गेला. या वादातून त्यांनी लग्नानंतर त्वरीत लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकरणात हिंसाचार किंवा गुन्हेगारी कृत्याचे कोणतेच आरोप लावण्यात आले नव्हते. दोन्ही पती आणि पत्नीने शांततेत कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं आणि परस्पर संमतीने आपलं लग्न मोडलं.
हे ही वाचा: पुणे : थायलंडची ट्रीप अन् हेलिकॉप्टर राईडची ऑफर; महापालिका निवडणुकीत मतदारांची 'दिवाळी'; प्रभाग कोणता?
कामाच्या पोस्टिंगवरून मतभेद अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पती आणि पत्नी लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच एकमेकांपासून वेगळे राहत होते. लग्नापूर्वी, दोन ते तीन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत असून त्यांनी प्रेमविवाह केला होता. संबंधित पती एक शिप इंजीनिअर असून तो जहाजावर कार्यरत होता. लग्नानंतर, त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की, त्याला कधी आणि कुठे पोस्टिंग मिळेल हे सांगता येत नाही आणि तो किती वेळ घरापासून दूर बाहेर राहणार, हे ही निश्चित नाही.
हे ही वाचा: प्रेयसीचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न, प्रियकराने थेट स्वतःची किडनी विकली; महाराष्ट्रातून अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
ही बाब लक्षात घेताच, त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत घटस्फोट घेणं योग्य राहील. अशा प्रकरणांमध्ये लागू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला. खरं तर, लग्न होण्यापूर्वी किंवा ते ठरवताना पती आणि पत्नीने या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा का केली नसावी, यावर अॅडव्होकेट सोनावणे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. संबंधित महिला ही पेशाने डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.










