इंस्टाग्रामवर झाली ओळख, पण तरुणाचा प्रेमसंबंधासाठी दबाव; नकार मिळताच थेट पीडितेच्या घरात घुसून...

पोलिसांनी एका तरुणीचा पाठलाग, छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी 29 वर्षीय पुरूषाला अटक केल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपीने इंस्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली आणि नंतर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला.

नकार मिळताच थेट पीडितेच्या घरात घुसून...

नकार मिळताच थेट पीडितेच्या घरात घुसून...

मुंबई तक

• 06:00 AM • 29 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर झाली ओळख, पण तरुणाचा प्रेससंबंधासाठी दबाव

point

तरुणीचा नकार मिळताच थेट घरात घुसून मारहाण अन् शिवीगाळ...

Crime News: बंगळुरूमध्ये एका तरुणीचा विनयभंग आणि तिला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी एका तरुणीचा पाठलाग, छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी 29 वर्षीय पुरूषाला अटक केल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपीने इंस्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली आणि नंतर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

इंस्टाग्रामद्वारे तरुणीशी प्रेमसंबंध 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव नवीन कुमार असं असून तो यलहंका तालुक्यातील बिल्लमारनहल्ली गावातील रहिवासी आहे. आरोपीने ज्ञानभारती पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीशी इंस्टाग्रामद्वारे प्रेमसंबंध निर्माण केले. तो तिच्या सतत मागे लागून तिला प्रेम करण्यास भाग पाडायचा. प्रेमसंबंधांसाठी तरुणीने नकार दिल्यानंतर, त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण सुद्धा केली. 

हे ही वाचा: प्रेयसीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला... हत्येमागचं नेमकं कारण काय?

पाठीवर आणि मानेवर वार करून पीडितेवर हल्ला 

22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:20 वाजता आरोपी तरुण महिलेच्या पीजी (पेइंग गेस्ट) निवासस्थानी आला तेव्हा त्यांच्यात मोठा वाद झाला. आरोपीने तिच्या डोक्यावर, पाठीवर आणि मानेवर वार करून तिच्यावर हल्ला केला. इतकेच नव्हे तर, त्याने पीडितेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! आता 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत... 'या' खाडीवर पुलाची निर्मिती

22 डिसेंबर 2025 रोजी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर, ज्ञानभारती पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC), 2023 च्या विविध कलमांखाली (74, 75, 76, 78, 79 आणि 351(2) गुन्हा दाखल केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलीस पथकाने तातडीने कारवाई केली आणि घटनेच्या 24 तासांच्या आत आरोपी नवीन कुमारला अटक केली. 

    follow whatsapp