मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! आता 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत... 'या' खाडीवर पुलाची निर्मिती

मुंबई तक

मुंबई महापालिकेकडून आता नवा पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत शक्य होणार आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील 'या' खाडीवर पुलाची निर्मिती
मुंबईतील 'या' खाडीवर पुलाची निर्मिती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत...

point

मुंबईतील 'या' खाडीवर पुलाची निर्मिती

Mumbai News: मुंबईतील मढ ते वर्सोवा प्रवास आता केवळ 10 मिनिटांत करता येणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून आता नवा पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत शक्य होणार आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण 2395 खर्च येणार असून मार्च 2029 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची अपेक्षा आहे. या प्रोजेक्टसाठी सर्वेक्षण आणि मातीच्या परिक्षणाचं काम सुरू झालं असून पुढील दोन महिन्यांत पुलाच्या बांधणीचं काम सुरू होणार आहे. 

जवळपास 2,395 कोटी रुपये खर्च

खरं तर, वर्सोवा खाडीवरील मढ-वर्सोवा पूल मढ जेट्टी रोडवरून खाडी ओलांडेल आणि वर्सोवा येथील फिशरीज युनिव्हर्सिटी रोडजवळ कनेक्ट होईल. या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर, मढ आणि वर्सोवामधील प्रवासाचं अंतर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचाच अर्थ, मढ आणि वर्सोवामधील 20 किलोमीटरचं अंतर कमी होऊन ते 2.6 किमी होईल. प्रवाशांना 90 मिनिटांचा प्रवास आता केवळ 10 मिनिटांत करता येणार आहे. या ब्रिजसाठी जवळपास 2,395 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तसेच मार्च 2029 पर्यंत या पुलाचं काम पूर्ण होणार आहे.  

हे ही वाचा: Govt Job: फ्रेशर्स तरुणांसाठी गूड न्यूज! सरकारी बँकेत मिळणार काम करण्याची संधी, 'असं' करा अप्लाय...

अंडरग्राउंड मेट्रो स्थानकाचं समुद्रकिनाऱ्याशी कनेक्शन 

अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन थेट समुद्रकिनाऱ्याला कनेक्ट होईल. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून 531 रुपयांच्या खर्चाने भूमिगत पादचारी मार्ग बांधला जाणार आहे. मेट्रो 3 ही देशातील सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आरे JVLR ते कफ परेड अशी 33 किमी आणि 27 स्थानकांदरम्यान सुरू झाली आहे. याच मार्गिकेतील विज्ञान केंद्र स्थानक हे वरळी भागात असून तेथील समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास दीड ते दोन किमी अंतरावर आहे. 

हे ही वाचा: बीड: रजिस्टर्ड लग्न, नंतर हनीमून सुद्धा झालं... पण लग्नानंतर 5 दिवसांतच नवरीने सासरच्या मंडळींना दिला धक्का!

भूमिगत पादचारी मार्ग बनवण्याची योजना 

मात्र, या स्थानकापासून वरळी बीचवर पोहोचायचं असल्यास 5 किमी दूर फेरा मारावा लागतो. ही समस्या टाळण्यासाठी MMRCL ने भूमिगत पादचारी मार्ग बनवण्याची योजना आखली आहे. हा मार्ग 1518 मी लांब असून तो विज्ञान केंद्र स्थानकापासून वरळी प्रोमेनेड पर्यंत बांधण्याचा प्लॅन आहे. यासाठी 531 कोटी 33 लाख 50 हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp