Crime News: दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथून एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील बिसरख पोलीस स्टेशन परिसरात कौटुंबिक वादातून दोन्ही पती आणि पत्नीने जीव गमावल्याचं वृत्त आहे. वाद सुरू असताना रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वत: फाशी घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुणाचं नाव अनिल पाल असून तो मूळचा सकरौली, एटा येथील रहिवासी होता. तो जवळपास एक महिन्यापासून त्याची पत्नी अनीतासह सरस्वती कुंज बिसरख येथे भाड्याच्या घरात राहत होता. अनिल एका सोसायटीमध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून कार्यरत असून त्याची पत्नी अनीता हाऊस कीपिंगचं काम करत होती.
हे ही वाचा: नंदुरबार: निर्दयी आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य; नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...
रागाच्या भरात पत्नी हत्या अन् नंतर आत्महत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन्ही पती आणि पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून मोठा वाद झाला. त्यावेळी, पीडित पत्नी चाकूने भाजी चिरत होती आणि वाद इतका टोकाला पोहोचला की अनिलने रागाच्या भरात आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच, या घटनेमुळे आरोपी अनिल प्रचंड घाबरला आणि पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: खोलीत फाशी घेत आत्महत्या केली. बराच वेळ, दोघेही घराबाहेर न निघल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांना संशय आला आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर, आत जोडप्याचे मृतदेह आढळले.
हे ही वाचा: मामाने दिली भाच्याच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी! कारण त्याच्याच गर्लफ्रेंडसोबत... नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण केलं. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. कौटुंबिक वादातून ही भयानक घटना घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. या धक्कदायक घटनेमुळे स्थानिकांमध्ये सुद्धा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत जोडप्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी माहिती दिली की, संबंधित पती आणि पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. मात्र, या वादातून इतकी भयानक घटना घडेल, याची कोणालाच कल्पना नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर प्रकरणाची पुढील कारवाई केली जाईल. आता, या घटनेचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT











