नंदुरबार: निर्दयी आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य; नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...

सोरापाडा गावाजवळील वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात सुमारे सहा ते सात महिन्यांच्या पुरुष जातीचं अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...

नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...

मुंबई तक

• 11:05 AM • 30 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

निर्दयी आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य

point

नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...

point

नंदुरबारमधील संतापनजक प्रकरण

Nandurbar Crime: नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सोरापाडा गावाजवळील वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात सुमारे सहा ते सात महिन्यांच्या पुरुष जातीचं अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आई-वडिलांनी आपल्या बाळाचं प्रेत गुपचूप टाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघडीस आलं असून, त्यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते नदीत फेकलं...

27 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलीस पाटील शरद वळवी यांना नदीपात्रात नवजात बालकाचा मृतदेह आढळला. अज्ञात पालकांनी बाळाच्या जन्माची माहिती लपवण्यासाठी आणि मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावण्यासाठी ते नदीत फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. संबंधित घटना वणव्यासारखी गावभर पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. 

हे ही वाचा: मामाने दिली भाच्याच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी! कारण त्याच्याच गर्लफ्रेंडसोबत... नेमकं प्रकरण काय?

पोलिसांचा तपास 

पोलीस पाटील शरद भरत वळवी यांच्या तक्रारीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 94 आणि 3(5) अंतर्गत अज्ञात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नूर पिजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाची पाहणी केली आणि आवश्यक पुरावे गोळा केले. 

हे ही वाचा: निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, मुंबईत भाजपात पहिला राजीनामा पडला, पत्र लिहित खदखद बोलून दाखवली

अशा प्रकारच्या निर्दयी कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांना लवकरात लवकर दोषींना शोधून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

    follow whatsapp