Crime News: बिहारच्या पूर्णिया येथे विवाहबाह्य प्रेमसंबंधातून भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एका विवाहित महिलेची तिच्या सासरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने जावयावर गंभीर आरोप केले आहेत. मृत महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, जावयाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते आणि तिच्या मुलीने या सगळ्याला विरोध केला असता तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
पत्नीची गळा दाबून केली हत्या...
संबंधित घटना ही अतरी पोलीस स्टेशन हद्दीतील केवटी गावात घडली. येथील रहिवासी असलेल्या नीतीश कुमार नावाच्या तरुणावर पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेतील पीडितेचं नाव जूली कुमारी असून तिचं नीतीश कुमासोबत लग्न झालं होतं. मुलीच्या हत्येप्रकरणाबाबत जूलीच्या आईने केलेल्या आरोपानुसार, नीतीशने आधी त्याच्या पत्नीला विष दिलं आणि नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. मंगळवारी (30 डिसेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
जावयानेच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचा आरोप करत पीडितेच्या कुटुंबियांनी अतरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती आहे. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा: बीड: 9 वी शिकणाऱ्या तरुणीचं टोकाचं पाऊल! पंख्याला गळफास घेत केली आत्महत्या...
पीडितेच्या आईने केले गंभीर आरोप
मृत महिलेच्या आईने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, "माझ्या जावयाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. एके दिवशी, माझ्या मुलीने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्यावेळी, तिने पतीच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. मात्र, तरीही जावयाने त्याचे विवाहबाह्य संबंध थांबवले नाही. उलट, तो माझ्या मुलीला मारहाण करू लागला. शेवटी, त्याने माझ्या मुलीला विष दिलं आणि नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली." तपासादरम्यान, घटनास्थळावरून सल्फास गोळ्यांचं पॅकेट सुद्धा जप्त करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: बीड आहे की नरक? आई-वडील ऊसतोडीसाठी जाताच किराणा दुकानदारातील राक्षस जागा, 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
पुढे पीडित जूलीची आई म्हणाली की, "एवढंच नाही तर माझ्या मुलीला मुलगी झाल्याने सुद्धा माझा जावई तिच्यावर नाराज होता. त्याला मुलगा हवा होता. त्यावेळी, आम्ही आमच्या जावयाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही. अखेर, त्याने माझ्या मुलीचा जीव घेतला." पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पतीला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तसेच, तपासानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT











