MP Crime News , इंदूर (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 'लव्ह जिहाद'चा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका कराटे ट्रेनरने स्वतःची खोटी ओळख सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
'करण सिंह' असल्याचं सांगून केली मैत्री
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महू परिसरातील रहिवासी आहे. 2020 मध्ये डॉ. आंबेडकर विद्यापीठात शिक्षण घेत असताना ती महू येथील एका कराटे क्लासमध्ये जात होती. तिथे एका तरुणाने आपले नाव 'करण सिंह' असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 14 जानेवारी 2024 रोजी घरात कोणीही नसताना आरोपीने तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने तिचे शोषण केले.
हेही वाचा : पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका
असा झाला नावाचा पर्दाफाश
आरोपीच्या खोट्या ओळखीचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान झाला. कराटे क्लासमध्ये बेल्ट ग्रेडिंगचा कार्यक्रम सुरू असताना, जेव्हा 'जावेद' असे नाव पुकारण्यात आले, तेव्हा करण सिंह म्हणून ओळख सांगणारा तरुण प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे गेला. यामुळे पीडितेला संशय आला. तिने विचारणा केली असता, आरोपीने त्याचे खरे नाव जावेद अख्तर असल्याचे कबूल केले. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने विरोध केला असता, त्याने तिला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.
अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल
पीडितेने आरोपीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जावेदने टोकाचे पाऊल उचलले. त्याने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून तरुणीचे फोटो एडिट केले आणि अश्लील फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. इतकेच नाही तर हे फोटो तिच्या नातेवाईकांनाही पाठवून तिची बदनामी केली.
धर्मांतरासाठी दबाव आणि भररस्त्यात राडा
26 फेब्रुवारी 2026 रोजी ही घटना अधिक गंभीर वळणावर पोहोचली. आरोपीने जुन्या एबी रोडवरील हनुमान मंदिराजवळ तरुणीचा हात धरून तिला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. "तुला मुस्लिम बनवून माझ्याकडेच ठेवणार," अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीलाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिस कारवाई
शेवटी पीडितेने आपल्या कुटुंबाला आणि सामाजिक संघटनांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तांत्रिक तपासणी सुरू आहे.पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी जावेद अख्तरला अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!
ADVERTISEMENT











