Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून सध्या, सोशल मीडियावर दोन तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. संबंधित घटना ही काही दिवसांपूर्वी यशोदा नगर बायपास परिसरात घडली असून येथे एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला निर्दयीपणे मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला यामध्ये एका तरुणी दुसऱ्या तरुणीचे केस ओढत आणि तिला रस्त्यावरून फरफटवत तिच्या कानाखाली मारत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक नावाच्या तरुणावरून या दोन्ही तरुणींमध्ये वाद झाला. पीडितेला मारहाण करताना तरुणी म्हणत आहे की, अभिषेकला तू सोडून दिलं होतंस. आता तो माझा आहे, तरीसुद्धा तू त्याला बाबू का म्हणतेस? परत म्हणशील का असं? बोल, परत त्याला बाबू म्हणशील का?
हे ही वाचा: शेजारच्या महिलेसोबत पतीचं अफेअर... पत्नीला कल्पना सुद्धा नव्हती अन् अचानक पतीचं टोकाचं पाऊल!
11 कानशिलात अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण...
यामधील पीडित मुलगी आरोपी तरुणीचे पाय पकडून माफी मागताना दिसत आहे, मात्र तरुणीने तिला मारहाण करणं सुरूच ठेवलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तरुणीने पीडितेचे केस ओढून तिला रस्त्यावर आपटलं आणि नंतर तिला 11 कानशिलात लगावल्या. त्यानंतर, तिने पीडितेला लाथा-बुक्क्यांनी सुद्धा मारहाण केली. तसेच, व्हिडीओ बनवत असलेल्या तिसऱ्या तरुणीने सुद्धा पीडितेला लाथ मारली.
हे ही वाचा: आईशी वाद झाल्याने रात्री उशीरा घराबाहेर पडली, पण लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...
पोलिसांचा तपास
व्हिडीओमध्ये सुरूवातीला आरोपी महिला पीडितेला म्हणत आहे की, "तू अभिषेकला बोलत होतीस की मी तुला आधी कुठेतरी भेटले आहे. मी तुला स्काय लॉनवर भेटले होते." यावर पीडितेने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने तिच्या छातीवर लाथ मारली आणि यामुळे ती रस्त्यावर पडली. पीडितेने आरडाओरड करून स्थानिकांची मदत सुद्धा मागितली. मात्र, कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून त्याचा तपास सुरू केला आहे. तसेच, आरोपीविरुद्ध योग्य कारवाई केली जाणार असल्याची माहिती पलिसांनी दिली.
ADVERTISEMENT











