भावाच्या मित्राने आधी महिलेच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा, अन् नंतर…

crime news : एका महिलेवर तिच्याच भावाच्या मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटीच होती.

crime news

crime news

मुंबई तक

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 08:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चाकू दाखवून तिच्यासोबत...

point

मित्राच्या बहिणीसोबत काय घडलं?

हे वाचलं का?

Crime news : बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेवर तिच्याच भावाच्या मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटीच होती. यादरम्यान, पीडितेच्या भावाचा मित्र घरात घुसला, नंतर त्याने चाकू दाखवत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. महिलेनं आरडाओरड केली असता, पण घटनास्थळाच्या शेजारी एका कार्यक्रम होता, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येण्यास विलंब झाला होता.

हे ही वाचा : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता, 2025-26 या वर्षात काय होणार?

नेमकं काय घडलं? 

ही घटना 27 डिसेंबर रोजी घडली असून महिलेनं पानापुर करियात ठाण्यात आरोपी विरोधात एफआरआय दाखल करण्याची विनंती केली. पोलिसांनी प्रकरणाची माहिती मिळवत या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. पीडितेचं म्हणणं आहे की, महिलेचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे तिचा पती तिला पत्नी म्हणून सांभाळ करणार नव्हता. पीडितेनं पोलिसांनी सांगितलं की, वहिनी ही आजाही होती आणि ती आपल्या माहेरी आली होती. कुटुंबातील लोक हे वहिनीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेले होते.

हे ही वाचा : नागपुरात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उमेदवारी न दिल्याने थेट ऑफिस फोडलं

चाकू दाखवून तिच्यासोबत...

दरम्यान, गावातील महिलेच्या भावाचा एक मित्र आहे, त्याने घरात घुसून मित्राच्याच बहिणीवर लाज आणणारं कृत्य केलं. जेव्हा महिलेनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने तोंडावर कापडाचा बोळा लावला होता. नंतर चाकू दाखवून तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    follow whatsapp