फोन आला अन् रात्री 2 वाजता तरुणीच्या घरी गेला, पण काही वेळानंतर तरुणाचा जीवच गेला... नेमकं काय घडलं?

संबंधित तरुणाला फोन आल्यानंतर तो रात्री 2 वाजताच्या सुमारास पीडितेच्या घरी पोहोचला आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यासोबत एक भयानक घटना घडली, ज्यामुळे त्याचा जीवच गेला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

रात्री तरुणीच्या घरी गेला तरुणाचा अन् जीव गेला...

रात्री तरुणीच्या घरी गेला तरुणाचा अन् जीव गेला...

मुंबई तक

• 12:51 PM • 28 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

फोन आला अन् रात्री 2 वाजता तरुणीच्या घरी गेला

point

पण काही वेळानंतर तरुणाचा जीवच गेला...

Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच गावातील एका 28 वर्षीय तरुणाची काही लोकांनी निर्दयी हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, संबंधित घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शैलेंद्र कुमार अशी मृत तरुणाची ओळख समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

प्रेमप्रकरणातून बेदम मारहाण करत हत्या... 

खरं तर, हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. मृत तरुण शैलेंद्र कुमारच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, पीडित मुलाला रात्रीच्या सुमारास फोन करून बोलवण्यात आलं. त्यानंतर, तो रात्री जवळपास 2 वाजताच्या सुमारास बराढी गावातील एका तरुणीच्या घरी पोहोचला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. 

हे ही वाचा: अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून

पोलिसांचा तपास 

या धक्कदायक घटनेनंतर, मृत तरुणाच्या कुटुंबात गोंधळ उडाला आहे. कुटुंबियांनी सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासोबतच, आता गावात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी सासाराम रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील लोकांची चौकशी केली जात असून घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. यासोबतच, फोन कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp