बारावीच्या परीक्षेत कॉपीवरुन वाद, डोक्यात वीट घालून विद्यार्थ्याची हत्या, आरोपी विद्यार्थ्याचे कुटुंबिय फरार

Crime News : बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये कॉपीवरुन हाणामारी झाली. या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेनंतर आरोपीचे कुटुंबिय गावातून संशयास्पदरित्या फरार झाले आहेत

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:32 PM • 28 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारावीच्या परीक्षेत कॉपीवरुन वाद

point

डोक्यात वीट घालून विद्यार्थ्याची हत्या

point

आरोपी विद्यार्थ्याचे कुटुंबिय फरार

Crime News : बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये कॉपीवरुन हाणामारी झाली. या हाणामारीत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात वीट घातली. यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेनंतर आरोपीचे कुटुंबिय गावातून संशयास्पदरित्या फरार झाले आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

नेमका वाद कशामुळे झाला?

अंकुर सिंह आणि सत्यम गौड हे दोघे गोरखपूरमध्ये एकाच वर्गात बारावीची परीक्षा देत होते. परीक्षा सुरू असताना कॉपी फेकल्यावरून आणि त्यानंतर वर्गातील निरीक्षकांनी त्यांना पाहिल्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा राग मनात धरून सत्यमने अंकुरला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात वीट घातली. मारहाणीत अंकुर गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला लखनऊला हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अंकुर हा इंटर सायन्सचा विद्यार्थी होता.

आरोपीचे कुटुंब फरार

आरोपी सत्यमचे वडील भगवान दास गौड हे गेल्या 10 वर्षांपासून गोरखपूरमध्ये हातगाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेची माहिती मिळताच गावात राहणारे सत्यमचे इतर नातेवाईक आणि कुटुंबीय अचानक गायब झाले आहेत. आरोपी सत्यमला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीचे कुटंबिय का फरार झाले आहेत याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. मात्र पोलिस याविषयी अधिक तसाप करत आहेत.

हे ही वाचा : एकीकडे सून घरकामात व्यस्त; तर दुसरीकडे आजोबाने 9 महिन्यांच्या नातीवर केला बलात्कार, सुनेनं बघताच काय घडलं?

पोलीस कारवाई

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, सध्या या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली जात असून, पोलीस योग्य तो तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील वाढता राग आणि हिंसक वृत्तीबद्दल पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

    follow whatsapp