Crime News : दोन्ही भावांनी मिळून एका विधवा महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. धाकट्या भावाने विधवा महिलेची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली; तर थोरल्या भावाने तिच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ही 35 वर्षीय विधवा थोरल्या भावासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात होती. 25 फेब्रुवारी रोजी तिचा लिव्ह इन पार्टनरच्या धाकट्या भावासोबत तिचा वाद झाला. या वादातून त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे यानंतर त्या महिलेचा प्रियकर नशेत घरी आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेकडे बघून त्याला जराही दया वाटली नाही. उलट त्याने महिलेच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्हा आरोपी सध्या फरार आहेत. मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
मुलीसह प्रियकराच्या घरी
35 वर्षीय मृत महिला शहपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरिओम चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. तिचा पती वारल्यानंतर ती जबलपूरमध्ये मजुरी करत असताना सहा महिन्यांपूर्वी तिची ओळख हरिओमशी झाली होती. गेल्या चार महिन्यांपासून ती आपल्या 14 वर्षांच्या मुलीसह हरिओमच्या घरी राहण्यास आली होती.
लोखंडी रॉडने वार करून हत्या
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हरिओमचा धाकटा भाऊ छोटू चौधरी (40) हा घरी आला होता. किरकोळ वादातून त्याने महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. डोक्यावर गंभीर वार झाल्यामुळे महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. आरोपी छोटूने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरीच मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी छोटूने मुलीला धमकावून तिथून पळ काढला.
मुलीवर केला बलात्कार
महिलेचा मृत्यू झालेला असताना तिचा लिव्ह-इन पार्टनर हरिओम चौधरी नशेत घरी पोहोचला. समोर आपली जोडीदार मृतावस्थेत पडलेली असतानाही त्याला पाझर फुटला नाही. उलट, त्याने एकट्या असलेल्या 14 वर्षांच्या मुलीला ओढत खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर खोलीला बाहेरून कडी लावून तो फरार झाला.
हे ही वाचा : 'या' राशीत लागणार चंद्रग्रहण, भीती नको; प्रेमानंद महाराजांनी सूतक काळासाठी सांगितले 'हे' उपाय
असा झाला खुलासा
गुरुवारी (26 फेब्रुवारी) सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि तिची मुलगी शेजारीच घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. पोलिसांनी मुलीला तत्काळ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, आरोपी हरिओम चौधरी आणि त्याचा भाऊ छोटू चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची खीस टीम नियुक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











