23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

23 वर्षीय तरुणीसोबत दोन वेगवेगळ्या टिकाणी बळजबरीने घृणास्पद कृत्य करून नंतर तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार...

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार...

मुंबई तक

28 Feb 2026 (अपडेटेड: 28 Feb 2026, 10:39 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार...

point

नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

Crime News: 23 वर्षीय तरुणीसोबत दोन वेगवेगळ्या टिकाणी बळजबरीने घृणास्पद कृत्य करून नंतर तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अपहरण, घृणास्पद कृत्य आणि हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित घटना ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यात घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी पीडिता सकाळी 10 वाजताच्या सुमारास आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तिचा प्रियकर सोमनाथ याने तिला लग्नाचं आमिष दाखवून जगसिंहपूरच्या सरला मंदिरात बोलवलं. त्यानंतर, पीडित तरुणी सांगितल्याप्रमाणे तिथे पोहोचल्यानंतर तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्याच्या ऐवजी तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यावेळी तिथे त्याने पीडितेसोबत दृष्कृत्य केलं आणि नंतर तिला बस स्टँडवर सोडून फरार झाला. 

हे वाचलं का?

बलात्कार अन् तरुणीची हत्या... 

या भयानक घटनेनंतर, पीडिता बस स्टँडवर बराच वेळ एकटीच आणि अस्वस्थ अवस्थेत उभी होती. दरम्यान, तिथून जात असलेला बाईकस्वार पीडितेला एकटा पाहून तिला मदत करण्यासाठी सरसावला. वृत्तानुसार, त्या तरुणाने पीडितेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर, त्याने तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि पारादीप येथील आपल्या घरी घेऊन गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यावेळी त्या तरुणाने पीडितेला घराच्या छतावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पुरावे मिटवण्यासाठी त्याने पीडितेला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून धक्का दिला आणि तिथून खाली पडल्यानंतर, तिचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळला. 

हे ही वाचा: कल्याण : 7 वर्षांचा खुशील अंगणात खेळत होता, भटका कुत्रा चावल्याने जीव गेला, वाचवण्यासाठी आलेल्या मित्रालाही...

पोलिसांनी दिली माहिती 

पोलिसांच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी पीडिता बराच काळ घरी न परतल्याने तिच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पीडितेच्या भावाने आपल्या बहिणीसोबत घृणास्पद कृत्य आणि तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित तरुणीचं अपहरण, दृष्कृत्य आणि हत्या या कलमांखाली गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा: सोलापूर : आई-वडील झोपेतून उठेनात दोन्ही मुली चिंतेत, समोरचं दृश्य पाहून काळजात धस्स झालं, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स देखील तपासले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेत समाविष्ट असलेल्या दोन आरोपींना न्यायालयात सादर केलं जाईल आणि त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

    follow whatsapp