जुन्या विचारांच्या वडिलांची हत्या, पोटच्या दोन मुलींनीच घेतला जीव; कसं होतं बाप-लेकींचं नातं?

Crime News : पोटच्या दोन मुलींनी आपल्या 59 वर्षीय वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या विचारांचे असलेले वडील मुलींना सतत टोमणे मारायचे. त्यांना घालून-पाडून बोलायचे. या त्रासाला वैतागलेल्या मुलींनी अखेर आपल्या वडिलांची हत्या करण्याचे ठरवले. 23 फेब्रुवारीच्या रात्री दोन्ही बहिणींनी मिळून चाकू भोसकून ही हत्या केली. यानंतर दोन्ही मुली आईला बिलगून रडू लागल्या

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:47 PM • 28 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

जुन्या विचारांच्या वडिलांची केली हत्या

point

पोटच्या दोन मुलींनीच घेतला जीव

point

आईला बिलगून ढसाढसा रडल्या

Crime News : पोटच्या दोन मुलींनी आपल्या 59 वर्षीय वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या विचारांचे असलेले वडील मुलींना सतत टोमणे मारायचे. त्यांना घालून-पाडून बोलायचे. या त्रासाला वैतागलेल्या मुलींनी अखेर आपल्या वडिलांची हत्या करण्याचे ठरवले. 23 फेब्रुवारीच्या रात्री दोन्ही बहिणींनी मिळून चाकू भोसकून ही हत्या केली. यानंतर दोन्ही मुली आईला बिलगून रडू लागल्या. घरात घुसलेल्या चोरांनी ही हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून

वडिलांवरची नाराजी

या दोन्ही आरोपी बहिणींपैकी एका आरोपी बहिणीचे नाव कोमल आहे. ती 32 वर्षांची आहे. वडिलांनी तिचे लग्न लावून न दिल्याने ती वडिलांवर नाराज होती. याच कारणामुळे ती घरातच स्वतंत्रपणे जेवण बनवून रहात होती. तर दुसरी बहिण 16 वर्षांची असून ती अकरावीत शिकते. तिच्या मोबाईल वापरामुळे वडील नाराज होते. ते सतत तिला आणि मोठ्या बहिणीला टोमणे मारायचे. घालून पाडून बोलायचे. यामुळे त्या त्रासल्या होत्या. यासाठी अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा प्रियकर रॉकीनेही मदत केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनेच्या चार दिवसानंतर त्याला ताब्यात घेतले. 

खीर घालून बेशुद्ध केले अन्

घटनेच्या रात्री दोन्ही बहिणींनी घरातील सर्वांसाठी खीर बनवली आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. खीर खाल्ल्यानंतर घरातील सर्वजण बेशुद्ध झाले. यानंतर रात्री दोन चाकूंनी वडिलांवर वार करुन हत्या केली. यानंतर घरात चोर शिरल्याचा बनाव त्यांनी रचला आणि चोरांनीच हत्या केल्याचे सांगितले. त्या आईशी बिलगून रडत होत्या तेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्वांना चौकशासाठी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यावेळी पोलिसांच्या तपासात दोन्ही मुलींनीच हत्या केल्याचे उघड झाले. 11 वीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रियकराने गुंगीचे औषध दिल्याचेही तपासातून निष्पन्न झाले.

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

पोलिस कारवाई

पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरलेले दोन चाकू, झोपेच्या गोळ्यांची रिकामी पाकिटे जप्त केली आहेत. जवळपास पाच दिवस या घटनेचा विविध अंगांनी पोलिस तपास करत होते. दोन बहिणी आणि एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.
 

    follow whatsapp