Crime: प्रयागराज पुन्हा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला डेप्युटी CMO चा मृतदेह…

मुंबई तक

24 Apr 2023 (अपडेटेड: 24 Apr 2023, 11:01 AM)

तेज प्रताप सप्रू हॉस्पिटल बेली येथील उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Dy. CMO) डॉ. सुनील कुमार सिंह यांचा मृतदेह प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये फासावर टकलेलल्या अवस्थेत सापडला

Deputy Chief Medical Officer (Dy. CMO) of Tej Pratap Sapru Hospital Belly Dr. Sunil Kumar Singh was found hanging in a hotel in Prayagraj

Deputy Chief Medical Officer (Dy. CMO) of Tej Pratap Sapru Hospital Belly Dr. Sunil Kumar Singh was found hanging in a hotel in Prayagraj

follow google news

प्रयागराज : येथील तेज प्रताप सप्रू हॉस्पिटल बेली येथील उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Dy. CMO) डॉ. सुनील कुमार सिंह यांचा मृतदेह प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये फासावर टकलेलल्या अवस्थेत सापडला आहे. सिव्हिल लाइन्स भागातील हॉटेल विठ्ठलच्या रुम क्रमांक 106 मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. (Deputy Chief Medical Officer (Dy. CMO) of Tej Pratap Sapru Hospital Belly Dr. Sunil Kumar Singh was found hanging in a hotel in Prayagraj.)

हे वाचलं का?

मृत डॉ. सुनील कुमार सिंग यांची संसर्गजन्य आजारांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह फासावर लटकलेला आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला आणि मॅनेजरनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कुमार आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा : बायकोचा अंड्याची पोळी बनवण्यास नकार, वैतागलेल्या पतीने….

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुनील कुमार सिंग हे मूळचे वाराणसीच्या पांडेपूरचे रहिवासी होते. त्यांची पत्नीही व्यवसायाने डॉक्टर आहे. मृतदेहाची अवस्था पाहून ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : सनीच अतिक अन् अशरफच्या हत्येचा मास्टरमाईंड! कोर्ट ते हॉस्पिटल केला होता प्लॅन

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला सवाल :

घटनास्थळी पोहोचलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ सुनील कुमार सिंग मूळचे वाराणसीचे होते. यावेळी त्यांची पोस्टिंग मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात होती. ते रोज वाराणसीहून ये-जा करत असे. मधेच कुठेतरी मुक्काम केला तर प्रयागराज ते वाराणसी दरम्यानच्या हॉटेलमध्ये राहायचे. पण तो प्रयागराज शहरात राहिले नाहीत. मग आताच सिव्हिल लाइन्स येथील हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह कसा सापडला? असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

    follow whatsapp