Crime News: एका 14 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे घळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत तरुणाचं नाव अंश साहू असून त्याला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन होतं. पीडित तरुण हा मध्य प्रदेशच्या भोपाल येथील पिपलानी पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम कॉलनीतील रहिवासी होता. अंश हा आठवी इयत्तेचा विद्यार्थी होता आणि त्याच्या पालकांचा तो एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे ऑनलाइन गेमच्या धोकादायक परिणामांबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
मुलाला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन
मृताचे आई-वडील हे एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेबाबत पालकांनी पोलिसांना सांगितलं की, अंशला काही काळापासून मोबाईल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. त्याच्या गेमिंगचा त्याच्या अभ्यासावर आणि वागण्यावर परिणाम होत होता. कुटुंबियांनी त्याला बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याच्या आई-वडिलांचं ऐकण्यास नकार दिला आणि तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याचा मोबाईल जप्त केला. सोमवारी त्याचे आई-वडील एका कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले आणि त्यावेळी अंश घरी एकटाच होता. पण, परत आल्यावर त्यांना त्यांच्या मुलगा खोलीत फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
हे ही वाचा: नववीच्या विद्यार्थीनीला वर्गातल्या 5 मुलांनी निर्जनस्थळी नेलं, सहावा बाहेरुन आला अन्... हादरवणारं प्रकरण
कुटुंबियांना आणि पोलिसांना संशय आहे की अंश एका अशा ऑनलाइन गेमचा बळी होता त्यामध्ये बरेच धोकादायक टास्क दिले जातात. असे गेम्स मुलांना बऱ्याचदा मानसिकरित्या गुलाम बनवतात आणि त्यांना हानी पोहोचवणारी कामे पूर्ण करण्यास प्रवृत्त करतात. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, अंश गेल्या काही दिवसांपासून एकदम शांत झाला होता आणि तो घरातील लोकांसोबत सुद्धा खूप कमी बोलायचा. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळेच त्याच्या वागण्यात हा बदल झाला असावा, असा संशय आहे.
हे ही वाचा: रील पोस्ट करण्यासाठी नकार दिला; बायकोने युट्यूब व्हिडीओ पाहिला अन् एका रात्रीत नवऱ्याला संपवलं
प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, हे प्रकरण मोबाईल गेमिंगच्या व्यसनामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या तणावामुळे असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून तो कोणता गेम खेळत होता आणि त्याला कोणते धोकादायक टास्क देण्यात आले होते का? याचा शोध घेण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











