रील पोस्ट करण्यासाठी नकार दिला; बायकोने युट्यूब व्हिडीओ पाहिला अन् एका रात्रीत नवऱ्याला संपवलं

मुंबई तक

• 09:01 AM • 04 Feb 2026

Crime News : रील पोस्ट करण्यावरुन झालेल्या वादात एका बायकोने आपल्या नवऱ्याची गळा घोटून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर, खून करण्याची पद्धत तिने युट्यूबवरुन शोधली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रील पोस्ट करण्यासाठी नकार दिला

point

बायकोने युट्यूब व्हिडीओ पाहिला अन् एका रात्रीत नवऱ्याला संपवलं

Crime News : सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपण माणुसकी, नाती, प्रेम विसरत चाललो आहोत का असा प्रश्न सतत विचारला जात असतो. याला दुजोरा देणाऱ्या घटना घडल्या की मन हेलावून जातं. रील पोस्ट करण्यावरुन झालेल्या वादात एका बायकोने आपल्या नवऱ्याची गळा घोटून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर, खून करण्याची पद्धत तिने युट्यूबवरुन शोधली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : "सावळा रंग आणि शारीरिक संबंध सुद्धा..." लग्नानंतर एका महिन्यातच बायकोने नको ती कारणे सांगून नवऱ्याला सोडलं!

शेजाऱ्यांनी दिली माहिती

मृत व्यक्तीचं नाव कैलास असं असून तो २५ वर्षांचा होता. खून झाला त्या रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. त्याच रात्री बायकोने युट्यूबवरुन शोधलेली पद्धत वापरुन नवऱ्याचा काटा काढला. त्याचा जीव घेऊन ती त्याच्या मृतदेहापुढंच रडत बसली होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी आले. तेव्हा मृतदेहाच्या अंगावर त्यांना जखमा आढळून आल्या. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कैलासच्या बायकोला ताब्यात घेतले. चौकशीत तिनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

...म्हणून केला खून

ज्या रात्री खून झाला त्या रात्री कैलास आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. हा वाद कशावरुन झाला? तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करण्यावरुन. कैलासच्या बायकोने एका लग्नात डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ तिला सोशल मीडियावर शेअर करायचा होता. मात्र कैलासने याला विरोध केला. यावरुन दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. संतापाच्या भरात कैलासच्या बायकोने त्याचा खून केला.

हे ही वाचा : 'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा; गोरखपूरमध्ये झाली होती हत्या, कसा झाला उलगडा?

गुन्ह्याची कबुली

सुरुवातीला कैलासची बायको काही बोलायला तयार नव्हती. मात्र पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. शेवटी तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून या घटनेमागे अजून काही वेगळे कारण आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.