Jamia Nagar : घरातल्याच जुन्या पेटीत सापडले मृतदेह, चिमुकल्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

07 Jun 2023 (अपडेटेड: 07 Jun 2023, 03:33 PM)

दिल्लीत (Delhi) एका घरातील जुन्या पेटीतून दोन चिमुकल्या (minor) मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नीरज (8 वर्ष)आणि आरती (6 वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. ही दोनही मुले घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला होता.

delhi 2 minor found dead inside house in jamia nagar batla house

delhi 2 minor found dead inside house in jamia nagar batla house

follow google news

दिल्लीत (Delhi) एका घरातील जुन्या पेटीतून दोन चिमुकल्या (minor) मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नीरज (8 वर्ष)आणि आरती (6 वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. ही दोनही मुले घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला होता. या दरम्यान कुटुंबियांना घरातील जुन्या पेटीतच दोन्ही मुलं मृताअवस्थेत आढळली होती. दरम्यान आता या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे की त्यांची हत्या करण्यात आली आहे?याचा तपास पोलीस करीत आहेत. (delhi 2 minor found dead inside house in jamia nagar batla house)

हे वाचलं का?

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जामिया नगर (jamia nagar) परीसरातील जोगा बाई एक्सटेंशनमधील एफ2 या घरात राहणारी दोन मुले, नीरज (8 वर्ष)आणि आरती (6 वर्ष) मंगळवार संध्याकाळपासून बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबियांनी दोन्ही मुलांचा शोध सुरु केला होता. कुटुंबियांना यावेळी घरात असलेल्या एका जुन्या पेटीत दोन्ही मुलांचा मृतदेह मृताअवस्थेत आढळला होता. या चिमुकल्यांच्या शरीरावर जखमेचे कोणतीच खुण आढळली नव्हती. तर एका तरूणाच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा : Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता महमूद अहमदने सांगितले की, घटनास्थळी सर्वात आधी मी दाखल झालो होतो. नेपाळला राहणारे हे कुटुंब आहे. तर मृत मुलांचे वडिल बलवीर हे सुरक्षारक्षकाचे काम करतात. बलवीर यांना 5 मुली आणि एक मुलगा आहे. या मुलांचा मृतदेह घरातल्या एका जुनाट पेटीत आढळला. या मुलांच्या शरीरावर कुठेच जखमेचे निशाण नाही आहे. फक्त एका मुलाच्या तोंडातून फेस निघतोय. दरम्यान या घटनेत मुलांचा नेमका कसा मृत्यू झाला आहे? याचा शोध घेतला जाणार आहे.

स्थानिक आमदार अमानतुल्लाह खानने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, दोन्ही मुले खेळ खेळता जुन्या पेटीच्या आत लपायला गेली. या पेटीत गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पण आता चिमुकल्याच्या मृत्यू मागचे खरे कारण आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येणार आहे. घरातली पेटी खुपच जुनाट होती. आणि घरातली मुले खेळत होती. खेळता खेळता ही मुले पेटीत जाऊन लपली होती. त्यावेळी अचानक पेटीचा झाकण बंद झाले आणि चिमुकल्याला देखील ते उघडता आले नाही. यामुळेच पेटीच्या आतमध्ये अडकून गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बलवीरचे शेजारी नौशाद चौधऱी यांनी दिली.

दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे काय कारण समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच चिमुकल्याच्या या मृत्यूच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

    follow whatsapp