लातूर हादरलं! डोंगराच्या पायथ्याशी ड्रग्ज फॅक्ट्रीवर DRI चा छापा, आरोपींमध्ये पोलीस?

मुंबई तक

10 Apr 2025 (अपडेटेड: 10 Apr 2025, 01:58 PM)

Latur Drugs Case: कारखान्यातून ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि संपूर्ण लॅब सेटअप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डीआरआयने 7 जणांना अटक केली आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये भल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

point

DRI ची मोठी कारवाई, कोट्यवधींचा माल जप्त

point

आरोपींमध्ये पोलीस हवालदारही असल्याची माहिती

Latur Drugs Case : लातूर जिल्ह्यात एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईच्या पथकाने लातूरच्या रोहिना गावात मेफेड्रोन बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी हा छापा टाकण्यात आला. हा कारखाना लातूरच्या एका दुर्गम डोंगराळ भागात चालवला जात होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली माघार, पण महाराष्ट्रावर परिणाम... वाचा इंटरेस्टिंग माहिती

डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11.36 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. त्यात कोरड्या स्वरूपात 8.44 किलो आणि द्रव स्वरूपात 2.92 किलो होतं. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 17 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे ही वाचा >> Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

कारखान्यातून ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि संपूर्ण लॅब सेटअप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डीआरआयने 7 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जण कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्याचे काम करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधाची किंमत 17 कोटी रुपये

सात आरोपींपैकी दोन आरोपींना मुंबईत पकडण्यात आलं आहे. एक आरोपी या आर्थिक पुरवठादार आहे आणि दुसरा त्याचा पेडलर आहे. डीआरआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपींनी मेफेड्रोनचे उत्पादन, आर्थिक मदत आणि पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

तुळजापूरमध्येही ड्रग्ज तस्करांवर कारवाई

तुळजापूरमध्ये झालेल्या कारवाईमध्येही मोठी साखळी समोर आली आहे. वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 14 आरोपी अटक केलेत. तर 21 फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेतायत...  पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचं मुंबई कनेक्शनही समोर आलंय. हे सगळं ड्रग्ज मुंबईवरुन पुरवलं जात होतं. याच आरोपात मुंबईतून महिला आणि तिच्या पतीला अटक केली. त्यानंतर पुणे, सोलापूरमधून प्रत्येकी एक-एक जणाला अटक केलीय. इतर आरोपी तुळजापूर परिसरातले आहेत. त्यामुळे भविष्यात या सर्व प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आढळतो का हे पाहणं महत्वाचं असेल.