तरुणीचं नुकतंच झालं होतं लग्न, कॉलेजला जाऊन येते असं म्हणाली अन् बॉयफ्रेंडसोबत गेली पळून, शोध घेताच फोनवर...

Extra marital affair : एका तरुणीने विवाह केला आणि नंतर आपल्याच नवऱ्याला मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे प्लिज सॉरी असा तिने मेसेज केला, नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

extra marital affair

extra marital affair

मुंबई तक

05 Sep 2025 (अपडेटेड: 05 Sep 2025, 05:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहाला झाले होते पाच महिने

point

नंतर तरुणीनं केलं कांड

point

बॉयफ्रेंडसोबत पैसे पाठवले

point

नेमकं काय घडलं?

Extra Marital Affair : लग्न हे सात जन्माचं बंधन आहे, पण काही लोकांनी या लग्न प्रथेची अक्षरश: लाज काढली आहे. अनेकदा कुटुंबियांच्या दबावाला बळी पडून विवाह करायचा आणि नंतर अनैतिक संबंध ठेवायचे अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. याच लग्नसंस्थेला आता काहीही किंमत राहिली नाही? कारण एका तरुणीने विवाह केला आणि नंतर आपल्याच नवऱ्याला मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे प्लिज सॉरी असा तिने मेसेज केला. बायकोचं नाव राणी असे आहे. संबंधित प्रकरण हे मिठनपुरा पोलीस ठाणे हद्दीतील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पतीनं बायकोला समजावलं तरीही बाहेर सुरु होतं लफडं, दोघांमध्ये अनेकदा झाला वाद, नंतर नवऱ्याने विष प्यायलं अन्...

नेमकं काय घडलं? 

नवऱ्याने तात्काळपणे या घटनेची माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांनी कळवली. त्यानंतर कळालं की आपली सून राणीने घरातून तब्बल 53 हजार रुपये रक्कम आणि सुमारे 1.70 लाखांचे दागिने पळवूले. हे सर्व पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असता गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉलेजला जाते असं सांगितलं आणि परतलीच नाही

पीडितेनं सांगितलं की, गुरूवारी माझ्या पत्नीने सांगितलं, की क्लब रोडवरील एका कॉलेजमध्ये जात आहे. मी तिला जाऊन दिले. पण दुपारी सायंकाळी झाली आणि संध्याकाळी रात्र झाली. माझी पत्नी परत घरी परतलीच नाही. त्यानंतर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

या प्रकरणात पीडितानं पोलिसांना सांगितलं की, साहेब! माझे लग्न साडेपाच महिन्यांपूर्वीच झालं आहे. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होतं. पण गेल्या काही दिवसांपासून माझी पत्नी सतत एका अनोळखी नंबरवरून फोनद्वारे संपर्क साधायची. तेव्हा मला तसा फासरा संशय आला नाही, मला वाटलं की ते तिच्या मैत्रिणीशी बोलत आहेत.

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! मित्रांचं सुरु होतं संभाषण, अचानक बोलणंच खटकलं, नंतर धारदार शस्त्राने मित्राचाच गळा चिरला अन् ...

पीडित नवऱ्याने सांगितलं की, गुरुवारी माझ्या पत्नीनं मला क्लब रोडवरील एका कॉलेजमध्ये जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिनं पुन्हा घरी परतेल असं सांगितलं होतं. पण ती पुन्हा घरी परतली नाही. कुटुंबासह त्याने शोधाशोध केली. त्यानंतर एका दुसऱ्याच नंबरवरून सॉरी मेसेज आला. तेव्हा तिनं पत्नीचा आणि दुसऱ्याच मुलाचा फोटो पाठवला. हे सर्व पाहून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकून गेली.

    follow whatsapp