Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रामधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. न्यायालयाकडून पोक्सो कायद्याअंतर्गत 25 वर्षांच्या तरुणाला त्याच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित प्रकरण जानेवारी 2022 मधील असल्याची माहिती आहे. या प्रकरणात कोर्टाने पीडितेचा जबाब आणि डॉक्टरांचे मेडिकल रिपोर्ट्स महत्त्वाचे ठरवले आहेत.
ADVERTISEMENT
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पीडिता घरी एकटीच असताना तिच्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीडित मुलीची आई घरी परत आली असता तिला या घटनेबद्दल समजलं. मुलीच्या आईने तिच्या पतीला आणि सासूला या घटनेबद्दल सांगितलं. मात्र, त्यांनी पोलिसात तक्रार करण्याऐवजी मुलगी आणि तिच्या आईला खोलीत कोंडून ठेवलं आणि गप्प राहण्यासाठी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.
पोलिसात तक्रार आणि कायदेशीर कारवाई
या घटनेच्या 40 दिवसांनंतर, मुलीची आई पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 ( दुखापत), 504 (अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 342 ( बंदिस्त करणे) तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा: अरुण गवळी मिल कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन.. दाऊदला नडणाऱ्या 'डॅडी'ची खतरनाक कहाणी
कोर्टाचा निर्णय
न्यायधीशांनी सर्व पुरावे, साक्षीदार आणि मुलीचा जबाब ऐकल्यानंतर मुलीच्या काकाला बलात्काराचा दोषी ठरवलं. न्यायालयाने त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आणि 50,000 रुपये दंडही ठोठावला.
हे ही वाचा: जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य! नंतर अश्लील व्हिडीओ सुद्धा...
वडील आणि आजीवर सुद्धा गुन्हा दाखल
या प्रकरणात मुलीची आजी आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी यासंबंधी हायकोर्टात अपील केलं आणि पोक्सो कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधातील आरोप रद्द करण्याची मागणी केली. यानंतर, त्यांचा खटला बलात्कार प्रकरणापासून वेगळा करण्यात आला. आजी आणि वडिलांविरुद्धचा खटला एकाच न्यायालयात सुरू असल्याचं माधव शर्मा यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
