पतीनं बायकोला समजावलं तरीही बाहेर सुरु होतं लफडं, दोघांमध्ये अनेकदा झाला वाद, नंतर नवऱ्याने विष प्यायलं अन्...

Crime News : पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने विश्वास तोडला तर ते नाते तुटतं आणि मोठा दुरावा निर्माण होतो. पत्नीनेच पतीला दगा दिला आणि नैराश्यात येऊन त्यानं आत्महत्या केली आहे. 

crime news

crime news

मुंबई तक

05 Sep 2025 (अपडेटेड: 05 Sep 2025, 04:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीच्या नात्याला तडा

point

पत्नी दुसऱ्यात पुरूषासोबत रंगली

point

नैराश्यात येऊन पतीची आत्महत्या

Crime News : पती-पत्नीचे नातेसंबंध हे विश्वासावर अवलंबून असते. जर पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने विश्वास तोडला तर ते नाते तुटतं आणि मोठा दुरावा निर्माण होतो. यानंतर पुन्हा हे नाते टिकवून ठेवणं कठीण होऊन बसतं. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. पत्नीनेच पतीला दगा दिला आणि नैराश्यात येऊन त्यानं आत्महत्या केली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील मुरेना येथील आहे. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिला आयपीएस अंजली कृष्णा अजित पवारांना थेट नडल्या, वाळू तस्करी करणाऱ्यांचे उपटले कान, फोन कॉलवर काय घडलं?

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हे प्रकरण अवैध प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. हे प्रकरण अंबा परिसरातील वॉर्ड क्र. 7 चे असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात बिहार कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका तरुणाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार पोलिसांनी सांगितलं, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता संतोष शर्मा (वय 40) यांच्या घशात आणि छातीत वेदना होत होत्या. त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मुकेश कुशवाह त्यांना बरेह अंबा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारास आणलं गेलं. त्याचक्षणी संतोष यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत तात्काळपणे माहिती देण्यात आली होती. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा प्रथमदर्शनी त्यांचा विष पिऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

चॅट आणि ऑडिओ देखील जप्त

पोलिसांना पत्नी आणि तिचा प्रियकर कुशवाहावर संशय बळावला होता. पोलिसांनीही दोघांचीही चौकशी केली होती. त्या तपासाच्यादरम्यान त्यांचे मोबाईल तपासण्यात आले असता, मृत्यू पतीच्या पत्नीचे मुकेश कुशवाह सोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोबाईलमधील चॅट आणि ऑडिओ देखील जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पत्नीनं आपल्या हातावर टॅटू काढला होता.

हे ही वाचा : काशीमिरा पोलीस ठाणे परिसरात अभिनेत्री पोलिसांच्या जाळ्यात, सेक्स रॅकेटचं मोठं कांड आलं समोर, नेमकं काय घडलं

नंतर जेव्हा संतोषने मुकेशच्या पत्नीचा टॅटू पाहिला असता, मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही पत्नीचे बाहेर लफडं होतंच. याच कारणाने पती संतोषने विष पिऊन टोकाचं पाऊल उचललं. याच प्रकरणात आता पोलिसांनी मृत पत्नीला आणि तिचा बॉयफ्रेंड मुकेश कुशवाहला तुरुंगात डांबलं.

    follow whatsapp