Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या महोबा जिल्ह्यात लव्ह, सेक्स आणि धोका..असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांदा येथे राहणाऱ्या एका तरुणीने महोबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तरुणीनं आरोप केला आहे की, सूपा गावात राहणाऱ्या तरुणाने लग्नाचं अमिष दाखवून खूप दिवस तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर लग्नाबाबत विचारल्यावर त्याने हुंड्याची मागणी केली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रियकरासह पाज जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं अन् शारीरिक संबंध केले
पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, जवळपास सहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिक्षणादरम्यान, तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली होती. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर तरुणाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा बहाणा करून तिला महोबा येथे बोलावलं. येथील एका तरुणाने आणि त्याच्या मित्राने शहरात रेंटवर एक रुम घेऊन दिलं. त्यानंतर तरुणाने लग्नाचं भरवसा देत अनेकदा शारीरिक संबंध केले. यादरम्यान, पीडित मुलगी दोनवेळा प्रेग्नंट झाली. पंरतु, प्रियकराच्या मित्राने जबरदस्ती गोळ्या देऊन गर्भपात केलं.
हे ही वाचा >> लग्नाच्या 25 दिवसानंतर दुसरी नवरी घरी आणली..पहिली पत्नी पोलिसांना म्हणाली, पतीच्या 2 मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून..
पीडित मुलीनं आरोप केला की, एक दिवस तरुण रात्रभर तिच्या रुममध्ये थांबला आणि संबंध केल्यानंतर जेव्हा त्याची तब्येत बिघडली, तेव्हा तो तिला एकटीला सोडून फरार झाला. जेव्हा तरुणीने लग्नाचा दबाव टाकला, तेव्हा त्या मुलाने जर लग्न करायचं असेल, तर 25 लाख रुपये द्यायला लागतील. हुंड्याची मागणी ऐकून तरुणीला धक्का बसला आणि थेट तरुणाच्या गावात पोहोचली. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी तिला शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी आरोपींच्या विरोधात केला गुन्हा दाखल
त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिवम यादव विरोधात बलात्कार आणि हुंडा मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तर आरोपीचा मित्र रामसिंह विरोधात तक्रारही दाखल केली. शिवमचे वडील आणि कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: मेट्रो 4 चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार... 'या' स्थानकांवरून धावणार मेट्रो
ADVERTISEMENT
