Shocking Murder Case Crime News : अमरावती जिल्ह्यात पथरोट मध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अरविंद नजीर सूरत नावाचा व्यक्ती त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता. अरविंदने त्याच्या पत्नीसोबत प्रेमविवाह केला होता. पण तरीही त्याच्या पत्नीने असं काही केलं, ज्यामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदच्या पत्नीचं अमित लवकुश मिश्रा नावाच्या 33 वर्षीय अविवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. अमितच्या घरी अरविंदची पत्नी जेवण बनवण्याचं काम करत होती. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. पण अरविंदला त्याच्या पत्नीवर संशय येऊ लागला. दोन दिवसांपूर्वी अमित जेव्हा त्याच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन आला, तेव्हा अरविंदला या घटनेबाबत कळलं. त्यामुळे अरविंद आणि त्याच्या पत्नीमध्ये वादविवाद झाले.
पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
मंगळवारच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. रागाच्या भरात पत्नीने तिचा प्रियकर अमितला सर्वकाही सांगितलं. अमित तातडीनं अरविंदच्या घरी पोहोचला. दोघांनी मिळून एक खतरनाक प्लॅनिंग केलं. पत्नीने अरविंदला झोपेच्या गोळ्या दिल्या, जेणेकरून तो बेशुद्ध होईल. त्यानंतर अमित आणि त्याच्या पत्नीने मिळून लाकडाने अरविंदच्या चेहऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर जखमी झालेल्या अरविंदचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> 'इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी...', तब्बल 10 वर्षानंतर शीना बोरा हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा!
या प्रकरणाचा तपास सुरु
पुढच्या दिवशी अरविंदचा मोठा भाऊ अशोकने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला आणि मंगळवारी रात्री अमितला अटक केली. बुधवारी अरविंदच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं. दोघांनीही पोलिसांसमोर त्यांचा गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, पोलीस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
हे ही वाचा >> पतीने पत्नीला समोसा आणला नाही..बायकोनं माहेरच्या लोकांना बोलावून पतीला धू-धू-धुतलं! प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं अन्..
ADVERTISEMENT
