'मला बोलावलं नंतर...' गणित विषय शिकवताना शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला मारहाण, डोळ्यातून येऊ लागलं रक्त

Crime news : एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीला मारहाण केली असता, विद्यार्थिनीच्या संवेदनशील भागावर म्हणजेच डोळ्यावर इजा झाली आहे. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले, एकूण प्रकरण काय समजून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

04 Sep 2025 (अपडेटेड: 04 Sep 2025, 01:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नावाला कलंकित करणारा प्रकार

point

शिक्षिकेनं विद्यार्थिनीला केली अमानुष मारहाण

point

डोळ्यातून येऊ लागलं रक्त

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नावाला कलंकित करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेनं आपल्या विद्यार्थिनीला मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकाने मारहाण करणं सामान्य आहे. पण, जर त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत असेल तर ती धक्कादायक बाब आहे. एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीला मारहाण केली असता, विद्यार्थिनीच्या संवेदनशील भागावर म्हणजेच डोळ्यावर इजा झाली आहे. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले होते. ही घटना ओडिशातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं रत्नागिरी हादरलं! आधी बारमध्ये काम करणाऱ्या दोघांचाच केला गेम, नंतर गर्लफ्रेंडलाच... बार चालवणारा सिरीअल किलर

'तिने मला दोनदा प्रश्न विचारला आणि नंतर माझ्या डोळ्यावर मारले'

कुटुंबाच्या तक्रारीवरून भुवनेश्वर शहरातील खंडागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने तक्रारीत म्हटलं की, मुलगी गणिताच्या वर्गात भसली होती. त्याचदरम्यान, शिक्षिकेनं तिला दोनदा बोलावले आणि तिच्या डोळ्यावर जोरात मारहाण केली. त्या घटनेवर मुलीनं सांगितलं की, 'गणिताचे शिक्षिका शिकवत होती. यादरम्यान, तिने मला दोनदा प्रश्न विचारला आणि नंतर माझ्या डोळ्यावर मारले'.

डोळ्यातून रक्तस्त्राव 

शिक्षिकेनं विद्यार्थिनीवर केलेला हल्ला इतका तीव्र होता की, मुलीच्या डाव्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं होतं. ती वेदनेनं मोठ्याने रडू लागली. या घटनेनंतर, शाळेच्या प्रशासनाने मुलीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला डोळ्याचे उपचार करणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचार सुरु केले. संबंधित प्रकरणात डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या पापणी, डोळ्यातील बुबुळाला दुखापत झाली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, मुलीच्या पापणीला गंभीर दुखापत झाली होती, त्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. पापणीची स्थिती पाहता, मुलीची दृष्टी पूर्णपणे परत येईल की नाही हे ठरवले जाईल. पीडितेच्या वडिलांनी शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मुलीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिक्षिकेनं तिला अंगठीने घातलेल्या हातानेच हल्ला चढवला.

हे ही वाचा : कुटुंबातील सदस्य झोपले होते गाढ, तरुणीची सटकली अन् थेट वडिलांच्या डोक्यात हातोड्यानं केला हल्ला, 'त्या' रात्री काय घडलं?

या प्रकरणात शाळेच्या व्यवस्थापकांनी कसलंही ठोस पाऊल उचललं नाही. बाल हक्क आणि शिक्षण कायद्यांमध्ये सांगितले की, कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा इजा ही विद्यार्थ्यांना होऊ नये.

    follow whatsapp