Crime News: उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एका 60 वर्षांच्या वृद्धाने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने लग्न केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. लग्नानंतर, आरोपीने पीडिताला जंगलात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं देखील सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, घरी सुद्धा अल्पवयीन पीडितेचा सतत शारीरिक छळ केला जात होता. मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक करून तुरुंगात पाठवलं असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
मंदिरात मुलीच्या भांगेत सिंदूर भरलं अन्...
ही घटना नेबुआ नौरंगिया गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या एका मध्यमवयीन म्हणजेच 60 वर्षीय पुरूषाने एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून मदनपूरमधील एका मंदिरात नेलं. तिथे त्याने मुलीच्या भांगेत सिंदूर भरलं आणि म्हणाला की "ही आता माझी पत्नी आहे." त्यानंतर, आरोपी वृद्धाने अल्पवयीन पीडितेला आपल्यासोबत जंगलात नेलं आणि तिथे त्याने मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर, त्याने पीडित मुलीला घरी पाठवलं आणि याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देखील त्याने पीडितेला दिली.
हे ही वाचा: तरुणी झोपली असताना अचानक पीजीमध्ये घुसला अन् खोलीला आतून कुलूप लावलं, नंतर तरुणीसोबत... नेमकं काय घडलं?
बऱ्याचदा पीडितेसोबत केलं घृणास्पद कृत्य
अल्पवयीन पीडितेने घाबरून या घटनेबद्दल कोणालाच सांगितलं नाही. पण मंगळवारी (2 सप्टेंबर) मुलगी शौचासाठी बाहेर गेली असता आरोपीने तिचं तोंड दाबलं आणि तिथून तिला उचलून घेऊन गेला. त्यावेळी सुद्धा आरोपी वृद्धाने पीडितेसोबत वाईट कृत्य केलं. काही वेळाने मुलीची आई तिच्या मुलीला शोधत बाहेर आली आणि तिला आरोपी पुरुष तिच्या मुलीला गेऊन घरात शिरताना दिसला. मुलीच्या आईकडून याबद्दल माहिती मिळाल्यानंतर, मुलीचे कुटुंबीय सुद्धा आरोपीच्या घरी पोहचले.
आईने पोलिसांनी दिली माहिती
या घटनेबद्दल त्वरीत पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांसह मुलीचे नातेवाईक सुद्धा आरोपीच्या घरी पोहचले. त्यावेळी मुलगी घाबरलेल्या आणि अस्वस्थ अवस्थेत असल्याचं आढळलं. आईला बघताच पीडिता रडू लागली आणि वद्धाने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं तिने सांगितलं. मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आणि पीडितेची सुद्धा मेडिकल तपासणी करण्यात आली.
हे ही वाचा: घटस्फोटित बायकांना पती आणायचा घरी, खोलीत शारीरिक संबंध अन् पत्नी बनवायची व्हिडीओ... नवरा बायकोचा 'हा' विचित्र खेळ
बुधवारी (3 सप्टेंबर) या प्रकरणात पीडितेच्या भावाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू असल्याची देखील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
