घटस्फोटित बायकांना पती आणायचा घरी, खोलीत शारीरिक संबंध अन् पत्नी बनवायची व्हिडीओ... नवरा बायकोचा 'हा' विचित्र खेळ
मध्य प्रदेशातील भोपालमध्ये एक तरुणावर घटस्फोटित महिलांना लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बातम्या हायलाइट

घटस्फोटित महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध

पत्नी बनवायची व्हिडीओ अन्...
Crime News: मध्य प्रदेशातील भोपालमध्ये एक तरुणावर घटस्फोटित महिलांना लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन महिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आरोपीने एक मॅट्रिमोनिअल साइटवर स्वत: घटस्फोटित असल्याचं सांगून पीडित महिलांशी ओळख केली. त्यानंतर, त्याने त्याच्या पत्नीची स्वत:ची आई अशी खोटी ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर त्या तरुणाने खोलीत जाऊन पीडित महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि आरोपीच्या पत्नीने या सगळ्याचे व्हिडीओ बनवले.
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
आरोपी तरुणाने बिझनेससाठी पैशांची गरज असल्याचं महिलांना सांगितलं. पीडित महिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पैसे दिले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी आरोपीला सांगितलं. पण त्या जोडप्याने त्यांना धमकी दिली की जर त्यांनी कोणाला काही सांगितलं तर ते त्या महिलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करतील.
आरोपींनी बिझनेस करण्याच्या नावाखाली दोन्ही महिलांकडून 85 लाख रुपये उकळले. एका महिलेने तर या सगळ्या प्रकाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला. तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला समजावलं. त्यानंतर, या प्रकरणाबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित प्रकरण बागसेवनिया पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: हैदराबाद गॅझेट गेमचेंजर ठरेल का?, मराठ्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळणं खरंच आहे सोप्पं?
लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अविनाश प्रजापती आहे. अविनाश विवाहित असून देखील त्याने मॅट्रिमोनिअल साइटवर स्वत:ची आयडी बनवली. त्यावेळी, त्याने घटस्फोटित महिलांना जाळ्यात ओढण्याचं ठरवलं. त्यामुळे आरोपीने प्रोफाइलमध्ये तो घटस्फोटित असल्याचं सांगितलं. अशाच पद्धतीने त्याने दोन्ही महिलांना फसवलं.
शारीरिक संबंध प्रस्थापित केले
अविनाशने मॅट्रिमोनिअल साइटवर पीडितेशी ओळख केली आणि एके दिवशी ती महिला त्याला घरी भेटायला आली असता त्याने पत्नीची ओळख त्याची आई म्हणून करून दिली. दोघांमध्ये बोलणं सुरू असताना, तो तिला प्रायव्हेट गप्पा मारण्याच्या बहाण्याने एका खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान, अविनाशच्या पत्नीने गुप्तपणे दोघांचे अश्लील व्हिडिओ बनवले.
हे ही वाचा: GR तर निघाला, पण मराठ्यांना कसे मिळणार कुणबी दाखले? टेन्शन घेऊ नका, 'ही' बातमी पाहा!
काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेला सांगितलं की लग्नापूर्वी बिझनेस वाढवण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, महिलेने त्याला 40 लाख रुपये रोख आणि 5 लाख रुपयांचे दागिने दिले. मात्र, त्यानंतर अविनाशने तिला लग्नासाठी नकार दिला.
पीडित महिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी अविनाशला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपीने अशा अनेक महिलांसोबत घाणेरडं कृत्य केल्याचं समोर येईल, अशी पोलिसांनी आशा व्यक्त केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.