वय सरत चाललंय लग्न होत नाही म्हणून...लेकाचा संपात अन् आईचीच केली हत्या, थरकाप उडवणारी घटना समोर

Crime News : एका उच्चशिक्षित तरुणाने विवाह होत नाही म्हणून आपल्याच आईची हत्या केली आहे. मृत महिलेची ओळख पटली आहे, एकूण प्रकरण काय जाणून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

04 Sep 2025 (अपडेटेड: 04 Sep 2025, 02:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणांचं विवाह होत नाही

point

तरुणाला आला राग आणि आईची केली हत्या

point

थरकाप उडवणारी घटना

Crime News : तरुणांच्याबाबतीलं सध्याचं वास्तव म्हणजे त्यांचं लग्नच होत नाहीत. याच त्रासामुळे सध्याचे तरुण वाटेल ते करतात. दुसरी बाजू म्हणजे मुलीच्या वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांचा विवाह होत नसल्याचं सांगण्यात येत. विवाह होत नाही म्हणून कोणी अगदी खालच्या थराला जात नाही. मात्र, एका उच्चशिक्षित तरुणाने विवाह होत नाही म्हणून आपल्याच आईची हत्या केली आहे. मृत महिलेची ओळख पटली आहे. तिचं नाव पारूल (वय 55) असे तिचं नाव आहे. तर ज्यानं हत्या केली त्याचं नाव विजय ठक्कर (वय 31) असे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मला बोलावलं नंतर...' गणित विषय शिकवताना शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला मारहाण, डोळ्यातून येऊ लागलं रक्त

दरम्यान, तरुण हा कॅनडाहून उच्च शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी म्हणजेच भारतात परतला होता. त्यानंतर त्याने लग्नासाठी कुटुंबियांकडे आग्रह धरला. नंतर त्याने रागाच्या भरात आपल्या आईची हत्या केली. संबंधित प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, विजय त्याच्या पालकांकडून सतत लग्नाची मागणी करू लागला होता. तो म्हणाला की, आता माझं वय सरू लागलं आहे. पण पालकांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असता, तो प्रचंड संतापला आणि त्याने हिंसक कृत्य केलं.

वृत्त माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार...

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विजयने रागाच्या भरातच आपल्या आईवर अनेक हल्ले केले होते. त्यानंतर आई पारूला ही जमिनीवर बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं रत्नागिरी हादरलं! आधी बारमध्ये काम करणाऱ्या दोघांचाच केला गेम, नंतर गर्लफ्रेंडलाच... बार चालवणारा सिरीअल किलर

बहिणीवरही केला होता हल्ला 

पोलिसांनी केलेल्या एकूण तपासातून समोर आले की, विजयचे वर्तन आधीच आक्रमक होते. त्याने अनेकदा आपल्या कुटुंबियावर हल्ले केले आहेत. तो त्याच्या आईशी आणि बहिणीशी सतत वाद घालायचा. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची बहीण नक्षीवरही बाटलीने हल्ला केला होता, मात्र, या घटनेनंतरही कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

आई पारूलच्या मृत्यूनंतर तिची बहीण नक्षीने भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत विजयविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांना लेक विजयला अटक केली आहे.

    follow whatsapp