Ratnagiri Crime : रत्नागिरीत तिहेरी हत्याकांडाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या हत्याकांडामुळे रत्नागिरी हादरून गेली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह आणखी दोन तरुणांचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव भक्ती मयेकर असे आहे. तर हत्या केलेल्या तरुणाचे नाव दुर्वास दर्शन पाटील असे आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्याच बारमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचाही खून केला. एकाचं नाव राकेश जंगम आणि सिताराम वीर असे त्यांचं नाव आहे. भक्तीची केलेली हत्या हे तिहेरी हत्याकांड असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, दुर्वास दर्शन पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शनि राशीत तयार होणार वर्षातील शेवटचं ग्रहण, देशात लवकरच दिसणार अन् काही राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळणार, काय सांगतं राशीभविष्य
हादरून टाकणारं तिहेरी हत्याकांड
संबंधित प्रकरणात दु्र्वास दर्शन पाटीलचा साथीदार निलेश रमेश भिंगार्डेचा देखील समावेश आहे. याला पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. राकेश अशोक जंगम रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील रहिवासी होता. 6 जून 2024 मध्ये रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडला आणि बऱ्याच काळानंतरही तो पुन्हा न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलगा बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात आई वंदना जंगम यांनी माहिती दिली.
भक्तीच्या खूनाची चौकशी
त्यानंतर भक्तीच्या खूनाची चौकशी सुरु असताना दुर्वास पाटीलने राकेश जंगमचा खून केल्याचा कबुलीनामा दिला. कोल्हापूरल जायचे असे सांगून राकेशला गाडीत बसवले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवासाच्या दरम्यान, राकेशचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून देण्यात आला होता. अशातच आता पोलिसांनी भक्तच्या खून प्रकरणात दुर्वास आणि विश्वास पवारला आधीच अटक केलं होतं. आता पोलिसांनी निलेश भिंगार्डे यालाही अटक केली आहे.
हे ही वाचा : Pune Crime : 79 जिवंत काडतुसे, 50 पिस्तूल, 91 कोयते आणि... बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांमध्ये 45 जण अटकेत
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
संबंधित प्रकरणात बारमधील फुटेज समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकऱ्यांनी सांगितलं की, दुर्वास पाटील यांच्या सायलीबारमधील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यातून काहीतरी घटनेशी संबंधित धागेदोरे लागतीच आणि माहिती हाती मिळेल, अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
