Pune Crime : 79 जिवंत काडतुसे, 50 पिस्तूल, 91 कोयते आणि... बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांमध्ये 45 जण अटकेत
pune crime : वापरण्यात येणारी बेकायदेशीर हत्यारे जसे की 79 जिवंत काडतुसे, 50 पिस्तूल पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यातही घेतलं आहे.

बातम्या हायलाइट

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ

79 जिवंत काडतुसे आणि 50 पिस्तूल जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई
Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दररोज पुण्यात गुन्ह्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच आता पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. वापरण्यात येणारी बेकायदेशीर हत्यारे जसे की 79 जिवंत काडतुसे, 50 पिस्तूल जप्त केल्या आहेत. तसेच काही आरोपींकडे असलेली धारदार शस्त्रेही ज्यामध्ये 91 कोयते आणि 12 तलवार जप्त करण्यात आली आहेत.
हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांसाठी असणार सुवर्णकाळ, काय सांगतं राशीभविष्य?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान, आरोपींवर आणि गुन्हे शाखेच्या युनिट्सने राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये प्राणघातक शस्त्रे आणि धारदार हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहिम राबवण्यात आली होती.
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या 40 जणांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या 40 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 45 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 50 पिस्तूल आणि 79 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
हे ही वाचा : GR तर निघाला, पण मराठ्यांना कसे मिळणार कुणबी दाखले? टेन्शन घेऊ नका, 'ही' बातमी पाहा!
संबंधित प्रकरणात एकूण 94 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 91 कुऱ्हाडी आणि 12 तलवारींसह एकूण 116 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली आहे.