GR तर निघाला, पण मराठ्यांना कसे मिळणार कुणबी दाखले? टेन्शन घेऊ नका, 'ही' बातमी पाहा!

मुंबई तक

How to get Kunbi caste certificate: हैदराबाद गॅझेटिअरमधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना 'कुणबी' जातीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. मात्र कुणबी दाखले नेमके कसे मिळवायचे हे जाणून घ्या.

ADVERTISEMENT

gr has been issued but how will maratha get kunbi certificates dont get stressed understand entire process
मराठ्यांना कसे मिळणार कुणबी दाखले?
social share
google news

छाया काविरे, मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक दिल्यानंतर शासन खडबडून जागं झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आरक्षणा संदर्भात उपसमितीने वेगवान पद्धतीने कामकाज केलं आणि 5 व्या दिवशी जरांगे पाटलांचं आझाद मैदानातलं उपोषण संपलं. विशेष म्हणजे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटसह मनोज जरांगे पाटलांच्या जवळपास सगळ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. 

राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, हैदराबाद गॅझेटिअरमधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना 'कुणबी' जातीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. मात्र यासाठी नक्की प्रक्रिया काय असणारे? मराठ्यांना कुणबी दाखले नक्की कसे मिळणार? ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण समजून घेऊया.

हे ही वाचा>> मराठा आरक्षण: सरकारने नवा GR केला जारी, नेमकं काय आहे नव्या जीआरमध्ये?

कुणबी दाखले नेमके कसे मिळणार?

सरकारने हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेण्याचा निर्णय घेतलाय. या नोंदींमध्ये 'कुणबी' जातीचा उल्लेख 'कापू' किंवा कृष्णाजी या नावाने आढळतो. शेती व्यवसाय करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख होती. या नोंदींमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सोपा झाल्याचं बोललं जात आहे. आता ही जी कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुलभता आणण्यासाठी गाव पातळीवर तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे. 

आता कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे. तर, मराठा समाजातले भुधारक, भूमिहीन म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाहीय आणि शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेले व्यक्ती यांच्याकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसेल तर त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचं त्यांचं वास्तव्य दाखविणारं प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp